IMPIMP

टांगेवाला ते आसाराम ’बापू’ बनण्यापर्यंतची कथा, असे ढासळले काळे ‘साम्राज्य’; जाणून घ्या पुर्ण स्टोरी

by sikandershaikh
asaram-bapu

नवी दिल्ली : वृत्त संस्था आसुमल थाऊमल हरपलानी उर्फ आसाराम (asaram bapu) अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला आसाराम नरबळी, हत्या यासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांत आरोपी आहे. एक काळ होता जेव्हा या व्यक्तीच्या दरबारात मोठ-मोठे दिग्गज हाजेरी लावत होते. लाखोंच्या संख्येने त्याचे अनुयायी आहेत. परंतु, 2013 मध्ये बलात्काराच्या प्रकरणात अडकल्यानंतर आसारामचे वाईट दिवस सरू झाले होते. आसुमल ते आसाराम बनवण्यापर्यंतची त्याची कथा आणि कशाप्रकारे एका केसने आसारामला उध्वस्त केले ते जाणून घेवूयात…

सायकल रिपेअरिंगपासून टांगासुद्धा चालवला

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एक निर्वासित मुलगा भारत-पाक फाळणीनंतर गुजरातच्या अहमदाबादमध्ये पोहचला. सुरुवातीला त्याने सायकलच्या दुकानात दुरूस्तीचे काम करण्यापासून टांगा चालवण्यापर्यंत अनेक कामे केली. परंतु, हा मुलगा पाहता-पाहता आसुमलपासून आसाराम बनला. आसारामने आपल्या आत्मचरित्रात इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण घेतल्याचे म्हटले आहे.

सिंधी संताचा अनुयायी बनण्याचा केला प्रयत्न

आसारामच्या (asaram bapu) एका मित्राच्या माहितीनुसार, त्याने किशोरवयात कच्छचे मोठे सिंधी संत लीला शाह बाबा यांचा अनुयायी बनण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याचा जिद्दी स्वभाव आणि रंग-ढंग पाहून संत लीला शाह बाबांनी त्यास कधीही स्वीकारले नाही. परंतु, हे सत्य कधीही जाहीरपणे समोर आले नाही. लवकरच आसुमलने आपले नवे नाव आसाराम बापू ठेवून सन्याशाची पांढरी वस्त्रे धारण केली. त्याच्या जवळपास लोक जमू लागले. 70 च्या दशकात आसारामने अहमदाबाद शहरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर एका ठिकाणी आपला पहिला आश्रम सुरू केला. अशाप्रकारे हळुहळु त्याचे साम्राज्य वाढू लागले.

2300 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती

जून 2016 मध्ये आयकर विभागाने आसारामची 2300 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती उघडकीस आणली होती. त्यावेळी मीडिया रिपोर्टनुसार, आसारामचे जगभरात सुमारे 400 आश्रम होते. आसारामचे यापैकी काही आश्रम त्याच्या साधकांनी मुळ मालकांकडून बळजबरीने बळकावले होते. तर अनेक आश्रमांच्या जमिनीचा वाद सुरू आहे. आसारामच्या अनेक आश्रमांच्या जमीनींचे न्यायालयांमध्ये खटले सुरू आहेत, कारण त्या जमिनींच्या मुळ मालकांना आता त्या जमिनी परत हव्या आहेत. अनेक लोक तर आपली मालमत्ता गमावून बसले आहेत.

कशी होत होती कमाई

आध्यात्म आणि समजासेवेवरील आसारामची काही मासिके प्रत्येक वर्षी त्यास कोट्यवधीचा नफा देत होती. सुमारे दोन डझन उत्पादनांच्या विक्रीतून सुद्धा कोट्यवधी रूपये मिळत होते. ज्यामध्ये अनेक प्रकारची आयुर्वेदिक औषधे, गोमूत्र, साबण, शॅम्पू आणि अगरबत्ती यांचा समावेश होता. या सामाज्याचे नियंत्रण सुमारे 400 ट्रस्टच्या हातामध्ये होते. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक वर्षी तो गुरु पोर्णिमेला गुरु दक्षिणा कार्यक्रमातून पैसा जमा करत होता. या दिवशी लाखो लोक येत असत आणि दक्षिणा म्हणून मोठी रक्कम भेट देत असत. तसेच इतर मार्गाने सुद्धा तो लोकांकडून पैसे लुबाडत असे.

कथित नरबळी प्रकरणापासून अधोगतीला सुरू वात

विविध प्रकारचे वाद सातत्याने आसाराम याचा पाठलाग करत होतेच. परंतु 1980 ते 2008 ते आपला विनाश होण्यापर्यंत आसारामने खुप चांगले दिवस पाहिले. त्याची अधोगती तेव्हा सुरू झाली जेव्हा अहमदाबादमध्ये त्याच्या आश्रमातील शाळेच्या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह साबरमती नदीत सापडले. आरोप झाले की, आसाराम तांत्रिक आहे, ज्याने तांत्रिक विधीसाठी या दोन विद्यार्थ्यांना ठार केले आहे.
हे आरोप सिद्ध झाले नाहीत पण आसारामची अधोगती तेव्हापासून सुरू झाली.
त्यावेळी तत्कालीन नरेंद्र मोदी सरकारने आरोपांच्या तपासा करता एका आयोगाची स्थापना केली होती.

असे ढासळले आसारामचे साम्राज्य

आसारामच्या (asaram bapu) अधोगतीचा सर्वात महत्वाचा भाग ऑगस्ट 2013 मध्ये सुरू झाला.
जेव्हा युपीमध्ये राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीने आपल्या कुटुंबियांसह दिल्ली पोलिसांना सांगितले की,
आसारामने जोधपुरच्या आपल्या आश्रमात तिचे शारीरीक शोषण केले.
20 ऑगस्ट, 2013 ला मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
ज्यानंतर आसारावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दिल्ली पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवला आणि केस जोधपुर पोलिसांकडे ट्रान्सफर केली.
2 सप्टेंबर, 2013 ला आसारामची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये सिद्ध झाले की तो सेक्स करण्यास सक्षम आहे.

7 एप्रिल, 2018 ला एससी-एसटी विशेष न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली.
25 एप्रिल, 2018 ला आसारामला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले.
न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या केसच्या ट्रायलच्या दरम्यान, 10 पेक्षा जास्त साक्षीदारांवर हल्ले झाले.
यापैकी तीन जणांना ठार करण्यात आले. एकाची तर जोधपुरच्या न्यायालयात सूरा खुपसून हत्या करण्यात आली होती.
परंतु, या प्रकरणांचा थेट संबंध आसारामशी असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले नाहीत.

Related Posts