IMPIMP

Aurangabad – Pune Expressway Project | नितीन गडकरी यांची मोठी घोषणा ! औरंगाबाद ते पुणे हे अंतर अवघ्या सव्वा तासात पूर्ण करता येणार; एवढा खर्च अपेक्षित

by nagesh
Aurangabad - Pune Expressway Project | Union Minister of Roads and Transport nitin gadkari announces aurangabad to pune express highway project

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइनकेंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री (Union Minister of Roads and Transport) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच औरंगाबाद ते पुणे एक्सप्रेस हायवे (Aurangabad – Pune Expressway Project) होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे औरंगाबाद ते पुणे हा प्रवास सुखकर होणार आहे. या नव्या मार्गामुळे औरंगाबाद ते पुणे हे अंतर अवघ्या सव्वा तासात पूर्ण करता येणार आहे. नितीन गडकरी यांनी औरंगाबाद मध्ये 5 हजार 570 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाचं (Road Project) लोकार्पण केलं. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. (Aurangabad – Pune Expressway Project)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, औरंगाबाद ते पुणे एक्सप्रेस महामार्गावर 140 किमी वेगाने प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 2024 पूर्वी मराठवाड्यातील सर्व रस्ते अमेरिकेच्या स्टँडर्डसारखे असतील असं आश्वासनही गडकरी यांनी दिले. आज औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग (Aurangabad National Highway) क्रमांक 52 औरंगाबाद ते तेलवाडी (Telwadi) या 3062 कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नगर नाका (Nagar Naka) ते केंब्रिज स्कूल (Cambridge School) या 73 कोटीच्या 14 किमी रस्त्याचं लोकार्पण करण्यात आले. यासह राष्ट्रीय महामार्ग 752 लेन पेव्हड शोल्डर बीटी रोड (Lane paved shoulder BT road) या 181 कोटींच्या 29 किमी रस्त्याचे देखील लोकार्पण करण्यात आले. (Aurangabad – Pune Expressway Project)

 

 

औरंगाबाद ते पुणे हे सध्या 225 किमी असणारे अंतर प्रस्तावित नवीन एक्सेस कंट्रोल महामार्गामुळे (Access Control Highway) केवळ सव्वा तासात पूर्ण करता येईल. आज गडकरी यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजनही पार पडले. यावेळी औरंगाबाद ते पैठण या 1670 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 42 किमी रस्त्याचे चौपदरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग 750 विभागातील चिखली दाभाडी तळेगाव या 37 किमी काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) उपस्थित होते.

 

 

Web Title : Aurangabad – Pune Expressway Project | Union Minister of Roads and Transport nitin gadkari announces aurangabad to pune express highway project

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या नवे दर

Jitendra Awhad On President Rule | ‘राष्ट्रपती राजवट लावा…लै…’ ! जितेंद्र आव्हाडांनी रात्री एक वाजून एक मिनिटांनी केलेली पोस्ट चर्चेत

Pune Crime | भावंडांना खाऊसाठी पैसे देऊन घराबाहेर पाठवून 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

Related Posts