IMPIMP

Babasaheb Purandare | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

by nagesh
Babasaheb Purandare | shivshahir babasaheb purandare passed away funeral government itamamat

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Babasaheb Purandare | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत आज मालवली आहे. सोमवारी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचं निधन (Died) झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली. तर, बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते 100 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर (Shirish Yadkikar) यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

दरम्यान, आज (सोमवारी) पुण्यात अंत्यसंस्कारा दरम्यान बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
यावेळी महाराष्ट्राने शिवआराधक गमावल्याची भावना अनेक दिग्गजांनी व्यक्त केली.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray),
सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) त्याचबरोबर विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करण्यात आला आहे.

 

Web Title: Babasaheb Purandare | shivshahir babasaheb purandare passed away funeral government itamamat

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | एसटी कामगारांच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत शरद पवारांचे महत्वाचे विधान, म्हणाले…

Ajit Pawar | राज्यात इंधनाचे दर कमी होणार का? अजित पवार म्हणाले…

Mumbai NCB | जळगाव जिल्ह्यात 1500 किलोचा गांजा जप्त; मुंबई NCB पथकांची कारवाई

 

Related Posts