IMPIMP

Basavwadi Social Foundation | निगडी येथे सत्यशोधक व्याख्यानमाला संपन्न

by nagesh
Basavwadi Social Foundation | Satya Shodhak lecture series concluded at Nigdi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Basavwadi Social Foundation | बसववादी सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सत्यशोधक व्याख्यानमाला रविवारी निगडी येथे संपन्न झाली. यावेळी मुस्लिम समाज सुधारणा चळवळीचे अध्यक्ष पैगंबर शेख यांनी मानवी हक्क आणि महात्मा फुले या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच महात्मा फुलेंचे समग्र वाड़मय सर्वांनी अभ्यासावे असे आवाहन देखील केले. (Basavwadi Social Foundation)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शेख म्हणााले की, महात्मा फुले अत्यंत हुशार विद्यार्थी होते. उच्च वर्णियांकडुन दुर्बल घटकांवर जो अन्याय होतो त्याबद्दल त्यांना चीड होती. विशेष करुन स्त्रियांची दयनीय अवस्था पाहुन त्यांनी या व्यवस्थेविरुध्द बंड पुकारून मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. हे सामाजिक परिवर्तनाचे काम करत असताना पुरोहित वर्गाकडून त्यांना भरपूर विरोध झाला. एवढेच नव्हे तर स्वतःचे घर सुध्दा सोडावे लागले तरी ते डगमगले नाहीत. ते जीवनाच्या अखेरपर्यंत निर्भयपणे लढत राहिले. ते द्रष्टे लेखक व कर्ते सुधारक होते. म्हणूनच त्यांना आपण आदराने क्रांतीसुर्य संबोधतो. म्हणूनच फुलेंचे समग्र वाड़मय सर्वांनी अभ्यासावे. असे आवाहन देखील शेख यांनी यावेळी केले. (Basavwadi Social Foundation)

 

 

बसववादी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सिध्दरामेश नावदगेरे म्हणाले की, देशाला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर
आज आपल्याला विज्ञानवादी दृष्टीकोन रुजवणे आवश्यक आहे. यासाठी जातीधर्माच्या भिंती तोडून पुन्हा एकदा
सर्वच सुधारणावादी महामानवाच्या विचारांचा जागर करावा या उद्देशाने पुरोगामी चळवळीतील अनेक कार्यकर्ते
एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमांतर्गत दरमहिन्याला एका महापुरुषांच्या जीवनावर व्याख्यान
आयाोजित करण्यात येईल. याशिवाय सत्यशोधक कॅलेंडर प्रकाशित करण्याची योजना देखील आहे.
व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी समता परीषदेचे आनंदा कुदळे, आम आदमी पार्टीचे कपिल मोरे, अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे राजकुमार माळी, जागतिक लिंगायत महासभेचे संतोष फताटे, प्रताप सोनवणे तसेच आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा भुषण ओझर्डे, सूत्रसंचलन राकेश आवटे, व आभार प्रदर्शन बसवराज कनजे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी पाटील, अनंत सिंदाळकर, संगमेश्वर यंदाचे इत्यादी बसवभक्तांनी परीश्रम घेतले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Basavwadi Social Foundation | Satya Shodhak lecture series concluded at Nigdi

 

हे देखील वाचा :

KRK | रणबीर-आलियासाठी केआरकेने दिलेल्या शुभेच्छा पाहून भडकले नेटकरी

Rohit Sharma | सेमीफायनलच्या आधी रोहित शर्माने केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील एकाही कर्णधाराला आजवर जमला नाही

T20 World Cup | सेमी फायनलमध्ये लढणाऱ्या भारताचे इंग्लंडविरुद्ध असे आहे रेकॉर्ड

 

Related Posts