IMPIMP

T20 World Cup | सेमी फायनलमध्ये लढणाऱ्या भारताचे इंग्लंडविरुद्ध असे आहे रेकॉर्ड

by nagesh
T20 World Cup | t20 world cup semi final india vs england head to head records of both teams

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  टीम इंडियाने (India) टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. या सेमी फायनलमध्ये भारत (India), न्यूझीलंड (New Zeland), इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakistan) या टीम्स पोहोचल्या आहेत. यामध्ये पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी तर भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. त्यामुळे भारताचे इंग्लंडविरुद्धचे रेकॉर्ड जाणून घेऊया… (T20 World Cup)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत टी-20 च्या 22 मॅच झाल्या आहेत, यातल्या 12 सामन्यांमध्ये भारताचा तर 10 सामन्यांमध्ये इंग्लंडचा विजय झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही संघामध्ये आतापर्यंत 3 मॅच झाल्या आहेत. यामधील 2 मॅच भारताने आणि एक मॅच इंग्लंडने जिंकली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये शेवटचा सामना 2012 साली झाला. 2007 सालच्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही या दोन टीम आमने-सामने होत्या. या सामन्यात युवराज सिंगने (Yuvraj Singh) स्टुअर्ट ब्रॉडला (Stuart Broad) 6 बॉल 6 सिक्स मारत मोठा विक्रम केला होता.

 

आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ ठरली आहे.
मात्र यंदाच्या वर्ल्डकप आपल्याला अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले.
त्यामुळे या क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल ते सांगता येत नाही.
त्यामुळे इंडियाला या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेसा असा खेळ करावा लागणार आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत आपला रेकॉर्ड कायम ठेवतो कि यंदा इंग्लंड भारतावर वरचढ ठरणार हे पाहणे
महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- T20 World Cup | t20 world cup semi final india vs england head to head records of both teams

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वाढदिवस साजरा करायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खून, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Satara News | पुण्यात येताना आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानीचा ठिय्या आंदोलन

 

Related Posts