IMPIMP

Rohit Sharma | सेमीफायनलच्या आधी रोहित शर्माने केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील एकाही कर्णधाराला आजवर जमला नाही

by nagesh
Rohit Sharma | new world record won most t20i matches as captain in calendar year rohit broke babar azam record

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियामध्ये (Austrelia) सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सुपर 12 मध्ये ग्रुप 2 मध्ये टीम इंडिया 4 विजयांसह अव्वल स्थानी आहे. या ग्रुपमधून भारताबरोबर पाकिस्ताननेदेखील (Pakistan) सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडबरोबर (England) होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रोहित शर्माच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद
सेमीफायनलमध्ये भारताची लढत 10 नोव्हेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या लढतीच्या अगोदर कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. सुपर १२ मधील अखेरची लढत ही रोहित शर्माच्या टी-20 करिअरमधील कर्णधार म्हणून 50 वी लढत होती. या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि रोहितच्या नावावर नव्या रेकॉर्डची नोंद झाली.

 

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आता रोहितच्या नावावर झाला आहे. हा विक्रम आधी पाकिस्तानच्या बाबर आझमच्या (Babar Azam) नावावर होता. बाबरने 2021 मध्ये कर्णधार म्हणून 21 सामने जिंकले होते. रोहितने 2022 मध्ये आतापर्यंत 22 सामने जिंकले आहेत.

 

इंग्लंडविरुद्ध भारताचे रेकॉर्ड
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत टी-20 च्या 22 मॅच झाल्या आहेत,
यातल्या 12 सामन्यांमध्ये भारताचा तर 10 सामन्यांमध्ये इंग्लंडचा विजय झाला आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही संघामध्ये आतापर्यंत 3 मॅच झाल्या आहेत.
यामधील 2 मॅच भारताने आणि एक मॅच इंग्लंडने जिंकली आहे.
आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ ठरली आहे. मात्र यंदाच्या वर्ल्डकप आपल्याला अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले.
त्यामुळे या क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल ते सांगता येत नाही.
त्यामुळे इंडियाला या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेसा असा खेळ करावा लागणार आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत आपला रेकॉर्ड कायम ठेवतो कि यंदा इंग्लंड भारतावर वरचढ ठरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rohit Sharma | new world record won most t20i matches as captain in calendar year rohit broke babar azam record

 

हे देखील वाचा :

Prashant Damle | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत दामलें बाबत केली ‘ही’ मोठी घोषणा

T20 World Cup | सेमी फायनलमध्ये लढणाऱ्या भारताचे इंग्लंडविरुद्ध असे आहे रेकॉर्ड

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

 

Related Posts