IMPIMP

Bhiwandi Building Collapse | भिवंडीमध्ये 3 मजली इमारत कोसळली, 40 जण ढिगार्‍याखाली दबल्याची भीती

by nagesh
Bhiwandi Building Collapse | 3-storey building collapses in Bhiwandi, 40 feared buried under debris

भिवंडी : सरकारसत्ता ऑनलाईन – Bhiwandi Building Collapse | भिवंडीच्या वलपाडा परिसरातील एक 3 मजली इमारत कोसळली असून
इमारतीच्या ढिगार्‍याखाली 40 रहिवासी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली
आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मदतकार्य
युध्दपातळीवर सुरू आहे. (Bhiwandi Building Collapse)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भिवंडीच्या कैलासनगर परिसरातील वलपाडा भागात वर्धमान कंपाऊंड नावाची 3 मजली इमारत होती. इमारतीच्या खालच्या बाजुला एक गोदाम अन् वरच्या 2 मजल्यावर नागरिक राहत होते. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानकपणे ही इमारत कोसळली.  इमारतीच्या ढिगार्‍याखाली 40 जण दबल्याची भिती व्यक्त करण्यात येत असून लोकांना ढिगार्‍याखालून बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जखमींना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Bhiwandi Building Collapse | 3-storey building collapses in Bhiwandi, 40 feared buried under debris

 

हे देखील वाचा :

Bharati Vidyapeeth’s New Law College | आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन मध्ये भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचे यश

SPPU News | वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यास छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार

Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘तुला दाखवतो, माझी खुप मोठी ओळख आहे’ असे म्हणून त्यानं पकडली पोलिसाची कॉलर

Food, Civil Supplies and Consumer Protection Department | रास्तभाव दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देणार – अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

 

Related Posts