IMPIMP

SPPU News | वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यास छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार

by nagesh
SPPU News | Chhatrapati Shivaji Maharaj Vanashree Award to Department of Botany, Savitribai Phule Pune University

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra State Govt) वनविभागामार्फत (Forest Department) दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार (Chhatrapati Shivaji Maharaj Vanashree Award) दि. २६ मार्च, २०२३ रोजी वनशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास (Savitribai Phule Pune University) वनमंत्री. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय यांच्या शुभहस्ते व चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) , मंत्री, उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य तथा पालक मंत्री पुणे जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे प्र- कुलगुरू मा. प्रा. संजीव सोनावणे (Prof Sanjeev Sonawane), विभागप्रमुख प्रा. ए.बी. नदाफ (Prof A. B. Nadaf) व प्रा. दिगंबर मोकाट (Prof Digamber Mokat) यांनी एम. डी. सी. सभागृह, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA Pune) येथे स्वीकारला आहेत. प्रा. दिगंबर मोकाट यांच्या वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय प्रथम व विभागस्तर प्रथम असे दोन पुरस्कार मिळाले आहेत यात रोख रु. एक लाख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, इ. चा समावेश आहे. प्रा. मोकाट यांनी गेल्या दोन दशकात वनस्पती संवर्धन, रोपे निर्मिती, पर्यावरण विषयी जनजागृती, वनस्पती-वने-औषधी वनस्पती विषयांची प्रकाशाने या मध्ये उल्लेखनीय काम केले आहेत. (SPPU News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

औषधी वनस्पती विषयाचे त्यांचे कार्य अनमोल आहेत. या पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाने दखल घेतली आहेत.
या कार्यक्रमावेळी वनविभागातील प्रधान सचिव श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक श्री. वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण डॉ. सुनीता सिंग, महाराष्ट्र राज्य, अमोल थोरात, विभागीय वन अधिकारी, पुणे व श्री. हनुमंत धुमाळ, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे इ. उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त झाले बद्दल प्रा. दिगंबर मोकाट व विभागाचे अभिनंदन  विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू प्रा. संजीव सोनावणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहेत. (SPPU News)

 

 

Web Title :- SPPU News | Chhatrapati Shivaji Maharaj Vanashree Award to Department of Botany, Savitribai Phule Pune University

 

हे देखील वाचा :

Police Inspector Death In Accident On Samruddhi Mahamarg | समृध्दी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकला धडकल्याने पोलिस वाहन चक्काचूर, महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू तर 3 कर्मचार्‍यांसह आरोपी गंभीर जखमी

SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जागतिक बौद्धिक संपत्ती दिन’ साजरा

Food, Civil Supplies and Consumer Protection Department | रास्तभाव दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देणार – अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वारजे माळवाडी पोलिस स्टेशन – भाजपच्या माजी पदाधिकार्‍याने केली गळफास घेऊन आत्महत्या

 

Related Posts