IMPIMP

भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचे निधन

by pranjalishirish
bjp leader dilip gandhi passes away at 70

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी  Dilip Gandhi (वय 70) यांचे आज पहाटे दिल्लीत उपचारादरम्यान निधन झाले आहे. दिलीप गांधी Dilip Gandhi यांना कोरोनाची लागण झाली होती. दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दिलीप गांधी Dilip Gandhi हे अहमदनगर दक्षिणमधून तीन वेळा खासदार निवडून गेले होते. केंद्रीय मंत्रीपदीही त्यांची वर्णी लागली होती.

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार नगरमध्ये केले जाणार की दिल्लीमध्ये याविषयी सरकारी यंत्रणा वा भारतीय‌ जनता पक्षाकडून कोणतीही माहिती‌ अद्याप देण्यात आलेली नाही. नगर जिल्ह्यात त्यांनी सुरुवात भाजपच्या पदाधिकाऱ्यापासून केली. नगर पालिकेत नगरसेवक म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 1985 मध्ये ते नगरपालिकेचे उपाध्यक्षही होते. भाजपच्या जिल्हा संघटनेत त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस तसेच इतर विविध पदे भूषविले. अखेरपर्यंत त्यांनी भाजपची साथ सोडली नाही.

Also Read :

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच चाकोंचे काँग्रेसवर टीकास्त्र; म्हणाले – ‘विरोधकांमध्ये एकजूट गरजेची, पण काँग्रेसमध्ये…’

पवार अन् मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीनंतर मंत्री मंडळात फेर बदलाचे ‘संकेत’; गृहमंत्रीपदी नवीन मंत्र्याची नियुक्ती केली जाण्याची शक्यता

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाचे कामकाज आता एक दिवसाआड

मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘लोकं पंतप्रधान मोदींना लवकरच देव मानतील’

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेते अन् मंत्र्याची बैठक, ‘या’ 3 महत्वाच्या प्रकरणांचा घेणार आढावा

मधुकर पिचड पडणार एकाएकी? राष्ट्रवादी खेळतोय ‘ही’ खेळी

जळगाव महापालिकेत राजकीय भूकंप, भाजपचे 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला

भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘ताजमहालचे नाव बदलून राम महल करणार’

Related Posts