IMPIMP

DGP Sanjay Pandey | मुंबई ATS मध्ये जागा रिक्त, पोलीस महासंचालकांची फेसबुक पोस्ट चर्चेत

by nagesh
CP Sanjay Pandey | mumbai police commissioner sanjay pandey declared dedicated police inspector for housing societies complaints at stations

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) हे न्यायालयातील प्रकरणामुळे चर्चेत आले असताना त्यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे (Facebook Post) ते आणखी चर्चेत आले आहेत. मुंबईत दहशतवाद विरोधी पथकात (Mumbai ATS) पोलीस अधीक्षक (SP) पदाच्या दोन जागा रिक्त असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. डीजीपी संजय पांडे (DGP Sanjay Pandey) सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच सक्रिय आहेत. परंतु सोशल मीडियाद्वारे त्यांच्याकडून दैनंदिन कामाचा अहवाल सादर केला जात असल्यामुळे ते आधिकच चर्चेत आले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, मुंबईत एटीएसमध्ये SP च्या दोन जागा रिक्त आहेत. Anti Terrorism Squad (ATS) पोस्टिंग ही एक प्रतिष्ठित पोस्टिंग आहे. ज्यात 25 % विशेष भत्ता आहे. इच्छुक अधिकारी यांनी थेट ADG-ATS सोबत संपर्क साधू शकतात, असे म्हटले आहे.

 

 

एटीएस प्रमुखांनी राज्य सरकारला (State Government) एक पत्र लिहून पथकामध्ये मनुष्यबळाची मागणी केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने देलेल्या वृत्तानुसार, एटीएससारख्या प्रतिष्ठित पथकात काम करण्यास वरिष्ठ अधिकारी (Senior Officer) फारसे उत्सुक नाहीत. पोलीस दलातील आजी-माजी अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra Anti-Terrorism Squad) गेल्या काही वर्षात आपली चमक गमावली आहे. काही महत्त्वाची प्रकरणे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) एटीएसकडून आपल्याकडे घेतली आहे. या प्रकरणातील काही प्रकरणांची मोठी चर्चा झाली.

 

एटीएस प्रमुख विनित अग्रवाल (IPS Vineet Agarwal) हे अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी आहे.
एटीएसचे माजी पोलीस महानिरीक्षक सुहास वारके (Former ATS Inspector General of Police Suhas Warke) यांची बदली झाल्याने मागील एक वर्षापासून हे पद रिक्त आहे.
डीआयजी शिवदीप लांडे (DIG Shivdeep Lande) यांना बिहारला पुन्हा पाठवण्यात आले.
त्यांचेही पद सध्या रिक्त असून अद्याप या पदावर कोणाचीही वर्णी लागलेली नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या दोन जागा रिक्त आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विनित अग्रवाल यांनी त्यांच्या युनिटमधील रिक्त पदांवर भाष्य करण्यास नकार दिला.
महाराष्ट्र पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मात्र ही रिक्त पदे लवकरच भरली जातील असे इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

 

Web Title :- DGP Sanjay Pandey | two vacant seats of superintendent of police in mumbai ats dg sanjay pandey facebook post goes viral

 

हे देखील वाचा :

Essential Vitamin | उत्तम आरोग्य आणि फिटनेससाठी अतिशय आवश्यक आहेत ‘हे’ 10 व्हिटॅमिन, जाणून घ्या – कोणत्या फूड्सद्वारे मिळेल

Eknath Khadse | ‘…म्हणून अण्णा हजारे यांचा वाईनला विरोध’, राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

जर Aadhaar Card बाबत केले ‘हे’ काम तर होईल कारावास, होऊ शकतो 1 कोटीपर्यंतचा दंड सुद्धा !

Pune Crime | ‘आरटीओ’समोर आंदोलन करणार्‍या ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या 190 रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल

 

Related Posts