IMPIMP

Almonds Side Effects | आरोग्यासाठी लाभदायक आहेत बदाम, परंतु ‘या’ 5 लोकांसाठी ठरू शकतात नुकसानकारक

by nagesh
Harmful Effects Of Raw Food

सरकारसत्ता ऑनलाइन – Almonds Side Effects | बदाम हे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. यामुळेच अनेकजण आहारात बदामांचा समावेश करतात. विशेषतः हिवाळ्यात बदामामधील प्रोटीन, फॅट, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा शरीराला फायदा होतो. बदाम केवळ शरीराच्या विकासासाठी कार्य करत नाहीत तर आवश्यक शक्ती देखील देतो. मात्र, काही बाबतीत बदाम खाल्ल्याने नुकसान (Almonds Side Effects) देखील होऊ शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

बदामाचा आरोग्यावर कधी होऊ शकतो वाईट परिणाम (When Almonds Can Have A Bad Effect On Our Health)?

 

1. हाय ब्लडप्रेशरची समस्या (High Blood Pressure Problem)
ज्यांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी बदाम खाऊ नयेत. अशा रुग्णांना ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष औषधे दिली जातात. अशा स्थितीत बदाम त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.

 

2. किडनीशी संबंधीत समस्या (Kidney Problems)
किडनी किंवा गॉल ब्लॅडरमध्ये स्टोनची समस्या असलेल्या लोकांनी बदाम खाऊ नयेत. बदामामध्ये ऑक्सलेट भरपूर प्रमाणात असते आणि त्यामुळे त्यांची समस्या आणखी वाढू शकते. ज्या लोकांना किडनी स्टोन झाला आहे किंवा किडनीशी संबंधित समस्या आहेत त्यांनी बदामाचे सेवन कमी करावे. (Almonds Side Effects)

3. पचनसंबंधी समस्या (Digestive Problems)
ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी बदाम टाळावेत. बदामामध्ये प्रोटीन आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे बदाम पचायला जास्त कठीण जातात. बदामाचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठता, सूज आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

4. अ‍ॅसिडिटी (Acidity)
ज्या लोकांना अ‍ॅसिडिटीची समस्या आहे त्यांनी बदाम खाणे टाळावे. यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे अपचन आणि गॅस वाढू शकतो.

 

5. वजन वाढणे (Weight Gain)
जर तुमचे वजन खूप वाढले असेल आणि तुम्हाला ते कमी करायचे असेल तर बदाम खाऊ नका.
बदामामध्ये कॅलरी आणि फॅट जास्त असते. ते खाल्ल्याने शरीरात चरबी जमा होऊ शकते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Almonds Side Effects | almonds side effects people with these 5 health issues must avoid almonds

 

हे देखील वाचा :

Sambhaji Raje | खासदार संभाजीराजेंची मोठी घोषणा ! ‘मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार’

DGP Sanjay Pandey | मुंबई ATS मध्ये जागा रिक्त, पोलीस महासंचालकांची फेसबुक पोस्ट चर्चेत

Essential Vitamin | उत्तम आरोग्य आणि फिटनेससाठी अतिशय आवश्यक आहेत ‘हे’ 10 व्हिटॅमिन, जाणून घ्या – कोणत्या फूड्सद्वारे मिळेल

 

Related Posts