IMPIMP

Brain Stroke | तुम्ही सुद्धा आंघोळ करताना ‘ही’ मोठी चूक करता का? ब्रेन स्ट्रोकला पडू शकता बळी

by nagesh
Brain Stroke | brain stroke brain haemorrhage causes symptoms and prevention measures

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Brain Stroke | गेल्या महिनाभरापासून देशात कडाक्याच्या थंडीमुळे ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) च्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. डॉक्टरांच्या मते, ब्रेन स्ट्रोकचे एक प्रमुख कारण म्हणजे आपली आंघोळ करण्याची चुकीची पद्धत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

पारा घसरल्याने होतोय मेंदूवर परिणाम
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आजकाल घसरणारा पारा थेट मेंदूवर परिणाम करत आहे. कडाक्याच्या थंडीतही अनेकजण थंड पाण्याने अंघोळ करतात. तर अनेकजण आंघोळ सुरू करताच थेट डोक्यावर पाणी ओततात.

 

मेंदू अचानक थंड पाणी सहन करण्यास तयार नसतो. अशा स्थितीत जेव्हा थंड पाणी अचानक डोक्यावर पडते, तेव्हा ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) किंवा डोक्याची रक्तवाहिनी फुटण्याचा धोका वाढतो.

 

हिवाळ्यात वाढते स्ट्रोकचे प्रमाण
वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ब्रेन स्ट्रोक कधीही होऊ शकतो, परंतु हिवाळ्यात ब्रेन स्ट्रोकच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होते. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराने ग्रस्त असलेल्यांना ब्रेन स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेज (Brain Hemorrhage) होण्याची अधिक शक्यता असते.

 

अशा स्थितीत या लोकांनी हिवाळ्यात अधिक सावध राहण्याची गरज आहे. या लोकांनी थंड पाण्याने आंघोळ करायला विसरू नका.

 

स्ट्रोकच्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात अतिशय थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे. शक्य असल्यास पाणी थोडे गरम करावे. आंघोळ करताना प्रथम पायावर, नंतर हातावर, नंतर धडावर आणि शेवटी डोक्यावर पाणी टाकावे.

 

ब्रेन स्ट्रोकची लक्षणे दिसल्यास रुग्णाला जवळच्या रुग्णालयात नेण्यास उशीर करू नका. या कामात थोडाजरी विलंब झाल्यास रुग्णाच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही आहेत ब्रेन स्ट्रोकची लक्षणे
– शरीराच्या एखाद्या भागात सुन्नपणा

– डोळ्यांनी स्पष्ट न दिसणे

– मुंग्या येणे किंवा अशक्तपणा जाणवणे

– डोकेदुखी, उलट्या किंवा मळमळ

– बोलण्यात किंवा समजण्यात अडचण

– श्वास घेण्यास त्रास होणे

– मेंदूतील रक्तस्रावामुळे बेशुद्ध होणे

 

यांना आहे जास्त धोका

– उच्च रक्तदाब असलेले रुग्ण

– 55 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक

– मधुमेही रुग्ण

– मायग्रेन किंवा अ‍ॅनिमिया ग्रस्त

– लठ्ठपणाचा सामना करणारे लोक

 

ब्रेन स्ट्रोक कसा टाळायचा

– थंडीत जमिनीवर किंवा गवतावर अनवाणी चालू नका

– मिठाचा वापर कमी करा

– शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका

– नेहमी गरम किंवा कोमट पाणी प्या

– धूम्रपान किंवा दारू पिऊ नका

– उच्च रक्तदाब आणि शुगरसाठी औषध घेत रहा

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Brain Stroke | brain stroke brain haemorrhage causes symptoms and prevention measures

 

हे देखील वाचा :

Satara Crime | मुंबई पोलिसांना गुंगारा देणारा म्हाडाचा तोतया अधिकारी सातारा पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra Weather | राज्यात पुन्हा हुडहुडी ! आगामी 2 दिवसात थंडीचा कडाका – IMD

President’s Police Medal-Pune | पुणे शहर पोलीस दलातील तिघांना ‘गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल प्रकाश चौधरी, पांडुरंग वांजळे आणि विजय भोंग यांना पोलीस पदक’ जाहीर

 

Related Posts