IMPIMP

CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Pune | सीबीआयकडून अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना अटक (व्हिडिओ)

by nagesh
CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Pune | Additional Revenue Divisional Commissioner from CBI Dr. Anil Ramod arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Pune | केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) Central Bureau of Investigation (CBI) पथकाने पुण्याच्या महसूल विभागातील अतिरिक्त महसूल आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड (IAS Dr. Anil Ganpatrao Ramod) यांना अखेर अटक केली आहे (CBI Arrest IAS Officer In Pune). राज्य महसूल विभागातील (Maharashtra Revenue Department) बडया अधिकार्‍याला लाच प्रकरणी सीबीआयने अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Pune)

 

https://www.instagram.com/reel/CtRQsh7LSIq/?utm_source=ig_embed&ig_rid=6476a5f8-662e-478f-aa60-07b30abfc08d

 

याबाबत अधिक महिती अशी की, तक्रारदाराने चार दिवसांपुर्वी डॉ. अनिल रामोड यांच्याविरूध्द तक्रार केली होती. तक्रारीची संपुर्णपणे पडताळणी केल्यानंतर तक्रारदाराकडून 8 लाख रूपयाची लाच (Pune Bribe Case) घेत असताना डॉ. अनिल रामोड यांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले (Pune Crime News). नोटांवरील बोटांचे ठसे देखील घेण्यात आले आहेत. दरम्यान, डॉ. रामोड यांच्या औंध-बाणेर (Aundh-Baner) परिसरातील ऋतुपर्ण सोसायटीतील (Rutuparna Society) बंगल्यावर देखील सीबीआयने छापेमारी सुरू केली आहे.

 

 

सीबीआयने बडया अधिकार्‍याला अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. सीबीआयमधील डीआयजी सुधीर हिरेमठ (IPS Sudhir Hiremath) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

 

Related Posts