IMPIMP

PM Kisan Yojana | 6 हजारांऐवजी शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये: ‘या’ सरकारने घेतला मोठा निर्णय

by nagesh
PM Kisan Yojana | pm kisan nidhi instead of 6000 of pm kisan samman nidhi new farmers will get 10000 rupees pm kisan nidhi 14th installment

नवी दिल्ली : PM Kisan Yojana | शेतकऱ्यांवरील कर्जाचे ओझे हलके व्हावे यासाठी राज्य सरकार (State Government) आणि केंद्र सरकार (Central Government) नव्याने काही योजना राबवत असते. त्यातीलच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून दिले जातात. ही योजना संपूर्ण देशात लागू होत आहे. त्याच धर्तीवर आणखी एक योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांऐवजी दहा हजार रुपये मिळणार आहे. सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (PM Kisan Nidhi 14th installment)

काय आहे योजना?

मध्य प्रदेश सरकारने (Madhya Pradesh Government) ही नवी योजना सुरू केली आहे. किसान कल्याण योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी 10 हजार रुपये देणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत (PM Kisan Yojana) दरवर्षी मिळणारे 6 हजार रुपये मिळते. आता राज्य सरकार 4 हजार रूपये देणार आहे. मध्यप्रदेश सरकारने 2020 मध्येच ही योजना सुरू केली होती. त्यावेळी हा पैसा 2 हप्त्यांमध्ये 2 हजारांच्या रूपात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत होता.

‘या’ शेतकऱ्यांना लाभ?

या योजनेचा लाभ केवळ मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, मध्य प्रदेशातील सर्वच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचे पैसे कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे मिळालेले नाही, त्यांच्या खात्यामध्येही हे पैसे येणार नसल्याचे सांगितले आहे.

पीएम किसान योजना?

पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्राची योजना आहे. याचा सर्व खर्च केंद्राकडून केला जातो. पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने डिसेंबर 2018 या साली केली आहे. या अंतर्गत 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी 2 हजार रुपयांचे 2 हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी 2 हजार रुपये अशा 3 हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जातात.

योजनेत नाव पाहण्यासाठी काय कराल?

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या.
होम पेजवर उजव्या बाजूला खाली ‘Farmers Corner’ असा ऑप्शन येईल.
‘Farmers Corner’ मध्ये ‘Beneficiaries List’ या ऑप्शनवर जाणे.
आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडणे.
लाभार्थ्यांची संपूर्ण यादी समोर येईल. त्यात आपले नाव शोधू शकता.

Web Title : PM Kisan Yojana | pm kisan nidhi instead of 6000 of pm kisan samman nidhi new
farmers will get 10000 rupees pm kisan nidhi 14th installment

Related Posts