IMPIMP

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura host nilesh sable apologize union minister and bjp leader narayan rane

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | सर्व प्रेक्षकांना, चाहत्यांना खळखळून हसवून सोडणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura) या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे (Nilesh Sable) आणि त्यांच्या टीमने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांची भेट घेतली आहे. त्यावेळी निलेश साबळे यांनी राणे यांची पाया पडून दिलगिरी व्यक्त केली आहे. एका शो दरम्यान राणेंची नक्कल करणारं हुबेहुब पात्र दाखवण्यात आलं होतं. यावरून राणे संमर्थकांनी रोष व्यक्त केला होता. यामुळे ‘चला हवा येऊ द्या’ टीमने राणेंची भेट घेतलीय.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रम आता एका वेगळ्याच वळणावर चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसापुर्वी एका शो
दरम्यान नारायण राणेंची नक्कल करणारं पात्र दाखवण्यात आलं होतं. नारायण राणेंची बदनामी होईल असं पात्र रंगवण्यात आलं, असा आरोप राणे
समर्थकांनी केला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर निलेश साबळेसह त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळुन राणेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, निलेश साबळे (Nilesh Sable) यांनी नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांची पाया पडून माफी मागितली. तसेच साबळे म्हणाले की, ‘कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आमच्या टीमकडून पुन्हा अशी चूक होणार नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title :-  Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura host nilesh sable apologize union minister and bjp leader narayan rane

 

हे देखील वाचा :

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

IPL 2022 | मुंबई-चेन्नई लढतीनं सुरू होणार आयपीएलचा थरार ! जाणून घ्या मोठी अपडेट

 

Related Posts