IMPIMP

Chandrakant Patil | बारमती मतदारसंघावरुन राजकारण तापलं, भाजप-राष्ट्रवादी नेत्यांमध्ये वाकयुद्ध; चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना आव्हान, म्हणाले…

by nagesh
Chandrakant Patil | bjp chandrakant patil on ncp ajit pawar supriya sule baramati constituency

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil | राज्यात शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे गट (Thackeray Group) यांच्यात संघर्ष पाहायला मिळत असताना दुसरीकडे बारामती मतदारसंघावरून (Baramati Constituency) भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांना प्रत्युत्तर दिल जात आहे. बारामतीमधील मतदार पवार कुटुंबालाच निवडून देतील असा विश्वास अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला आहे. तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार म्हणाले, बारामतीत भाजपकडून ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, त्याचा काही फरक पडणार नाही. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं काम बोलतं, त्यामुळे त्या निवडून येतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, गेल्या वेळी सुप्रिया सुळे थोडक्यात वाचल्या. यावेळी परमेश्वरही त्यांना वाचवू शकणार नाही. आमचे प्रयत्न सुरु आहेत. प्रयत्न करणारा प्रत्येकजण यश मिळावं यासाठीच प्रयत्न करत असतो. महाराष्ट्रात सुख, समृद्धी आणि सुरक्षा सर्वसामान्यांना प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

 

अजित पवारांचा बावनकुळेंना खोचक टोला

 

पुण्यात बोलताना अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना (Chandrasekhar Bawankule) प्रत्युत्तर देताना खोचक टोला लगावला आहे.
यावेळी त्यांनी 2019 ची एक आठवण करुन दिली.
बारामतीकरांना कुणाचं बटण कसं दाबायचं, हे चांगलं माहिती आहे, असे पवार म्हणाले.
आम्हाला काहीही वाटत नाही. असे खूपजण येतात आणि लक्ष्य करतात.
गेल्या 55 वर्षात असे कितीतरी जण आले आणि कितीतरी जण गेले.
खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत.
बारामतीकरांना चांगलं माहिती आहे कोणतं बटन दाबायचं.
येत्या निवडणुकीत त्यांचं काम ते चोखपणे बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp chandrakant patil on ncp ajit pawar supriya sule baramati constituency

 

हे देखील वाचा :

Atul Bhatkhalkar | ‘प्रकरण अगदी वाया गेलेलं आहे… हे तर भोंदू हृदयसम्राट’, भाजप नेत्याची शिवसेनेवर बोचरी टीका

Allu Arjun Net Worth | अबब ! आलिशान बंगला, लग्झरी गाड्या, महिन्याला ‘इतके’ कोटी कमावतो ’पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुन

Pune Crime | मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तावर असताना रिक्षाची पोलिसाला धडक; कर्मचारी गंभीर जखमी

 

Related Posts