IMPIMP

Allu Arjun Net Worth | अबब ! आलिशान बंगला, लग्झरी गाड्या, महिन्याला ‘इतके’ कोटी कमावतो ’पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुन

by nagesh
Allu Arjun Net Worth | allu arjun net worth 350 crore rupees earns 2 crore per motnh luxury cars house inside photos

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Allu Arjun Net Worth | एक असा अभिनेता आहे, जो कुणासारखाही नाही, तो म्हणजे अल्लू अर्जुन. अल्लू अर्जुन हा तेलुगु स्टार आहे. ’पुष्पा: द राइज’ (Pushpa Movie) चित्रपटानंतर अल्लू अर्जुनचे तारे चमकत आहेत. त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाबाबत प्रत्येक गल्लीबोळात आवाज उठला आहे. चर्चा झाली आहे. अल्लू अर्जुनने जागतिक स्तरावर प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. (Allu Arjun Net Worth)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या चित्रपटासाठी त्याला परदेशासह सर्वत्र समीक्षकांकडून प्रशंसा मिळाली आहे. अशाच प्रकारे या अभिनेत्याने इतक्या वर्षांत कठोर परिश्रम करून स्वत:ला विश्वासार्ह बनवले आहे. अल्लू अर्जुन हा बँकेबल स्टार असल्याचे म्हटले जाते.

 

सध्या तो एका चित्रपटासाठी 125 कोटी रुपये घेतो. त्याची फी सलमान खानच्या बरोबरीची झाली आहे. त्याने अक्षय कुमारला मागे टाकले आहे. आघाडीचा स्टार अल्लू अर्जुन लग्झेरियस लाईफ जगतो. एशियानेटनुसार अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती 350 कोटी रुपये आहे. याशिवाय अल्लू अर्जुन अनेक गोष्टींमधून पैसे कमावतो, ज्यामध्ये ब्रँड एंडोर्समेंटचा सुद्धा समावेश आहे. (Allu Arjun Net Worth)

 

डीएनएच्या रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनने ’पुष्पा: द राइज’साठी 32 कोटी रुपये घेतले होते. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार अल्लू अर्जुन आता ’पुष्पा : द रुल’साठी 100 कोटी फी घेत आहे.

 

अल्लू अर्जुन एका महिन्यात दोन कोटी रुपये कमावतो. अशावेळी त्याची वार्षिक कमाई 24 कोटी होते.
याशिवाय अल्लू अर्जुन हा अनेक लोकप्रिय ब्रँडचा प्रसिद्ध चेहरा आहे. अल्लू अर्जुन यासाठी 4 कोटी रुपये घेतो.

 

याशिवाय अल्लू अर्जुनने हैदराबादस्थित हेल्थकेअरमध्येही पैसे गुंतवले आहेत. हा मेडिकल ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे.
अल्लू अर्जुनचे घर हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये आहे जो शहरातील सर्वात पॉश एरिया मानला जातो.
घराच्या आत खूप सुंदर इंटीरियर आहे. तसेच एक प्रायव्हेट पूल आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अल्लू अर्जुनचा आठ हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधलेला बंगला बाहेरूनही अतिशय सुंदर दिसतो. त्याची किंमत 100
कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय अल्लू अर्जुनने मुंबईत टू बीएचके अपार्टमेंट खरेदी केले आहे.

 

हे त्याने 2015 मध्ये खरेदी केले होते. अल्लू अर्जुनच्या कार कलेक्शनबाबत बोलायचे तर त्याच्या घराच्या गॅरेजमध्ये
एकापेक्षा एक कार आहेत. यामध्ये रेंज रोव्हर वोग, हमर एच2, व्होल्वो एक्ससी 90 टी8 एक्सलन्स,
मर्सिडीज जीएलई 350डी, जॅग्वार एक्सजे एल आणि बीएमडब्ल्यू एक्स 6 एम यांचा समावेश आहे.

 

प्रत्येकाची किंमत लाखांमध्ये आहे. मोजक्याच भारतीय सेलिब्रिटींमध्ये अल्लू अर्जुनचा समावेश होतो,
ज्यांच्याकडे खाजगी जेट देखील आहे. अनेकदा अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासोबत यात प्रवास करतो.

 

याशिवाय, अल्लू अर्जुनची पर्सनल व्हॅनिटी व्हॅन – द फाल्कन देखील आहे जिची किंमत 7 कोटी रुपये आहे.

 

Web Title :- Allu Arjun Net Worth | allu arjun net worth 350 crore rupees earns 2 crore per motnh luxury cars house inside photos

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तावर असताना रिक्षाची पोलिसाला धडक; कर्मचारी गंभीर जखमी

Pune Ganesh Visarjan-2022 | पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, तरुणाईचा जल्लोष

Mumbai Crime | चक्क मुलानेच बाप्पाला लुटले; गळ्यातील हार चोरुन झाला पसार

 

Related Posts