IMPIMP

Chandrakant Patil | ‘अजित पवार आज पुन्हा गायब झाले वाटतं’, चंद्रकांत पाटलांचा टोला

by nagesh
 Chandrakant Patil | is ajit pawar disappear again today chandrakat patil statement in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राज्याच्या राजकारणात (Maharashtra Political News) चर्चेत आहेत. बुधवारी (दि.26) कालवा समितीच बैठक आयोजित करण्यात आली होती. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, अजित पवार या बैठकीला गैरहजर राहिल्याने पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहे. यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.

 

अजित पवार आज पुन्हा गायब झाले वाटतं, असा मिश्किल टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. पुण्यात अधिकाऱ्यांशी चर्चा करताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टोला लगावला. बुधवारी पुण्यात चंद्रकातं पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीची बैठक (Canal Committee Meeting) आयोजीत केली होती. या बैठकीला अजित पवार हजर राहणार होते. मात्र ते गैरहजर राहिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बैठकीच्या ठिकाणी आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कारमधून उतरताना उपस्थित अधिकाऱ्यांना विचारलं, अजितदादा आलेत का? यावर अधिकारी म्हणाले, नाही आले… अजित दादांसाठी मी धावत पळत आलो. यानंतर चंद्रकांत पाटील अजित पवारंना उद्देशून म्हणाले, आज पुन्हा गायब झाले वाटतं. चंद्रकांत पाटील गमतीने म्हणाले असले तरी याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

 

 

Web Title :- Chandrakant Patil | is ajit pawar disappear again today chandrakat patil statement in pune

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | अजित पवारांच्या ‘भावी मुख्यमंत्री’ पदाबाबतच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले…

New National Education Policy (NEP) | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील : भारती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण द्यावे

Nana Patole | ‘… तर काँग्रेसचा प्लान तयार’, नाना पटोलेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण

Chandrakant Patil | ‘… पण मी पालकमंत्री म्हणून पाणी सोडता येत नाही’ – चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

 

Related Posts