IMPIMP

Chandrakant Patil | भाजपमध्ये जे-जे संयम ठेवतात त्यांना ‘सब्र का फल मीठा है’ याचा अनुभव येतो – चंद्रकांत पाटील

by nagesh
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil demands president rule in state maharashtra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन वर्षानुवर्षे मेहनत घेऊन वोटबँक (Vote bank) तयार केली जाते. ही वोट बँक संत-महंत पर्यंत पोहोचते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही (Chhatrapati Shivaji Maharaj) हिंदुत्वाची वोटबँक तयार केली. त्यावर अटलजी, अडवाणी आणि मोदी यांनी कळस चढवला. त्यामुळे तिकीट पक्षाचे असते, वोटबँक पक्षाची असते. त्यामुळे कर्तुत्व पाहून एखाद्या व्यक्तीला तिकीट दिले जाते, असे सांगत भाजप (BJP) कुणावरही उगाच अन्याय करत नसल्याचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आज पुण्यात बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुढे म्हणाले, तयार असलेली वोटबँक तुम्हाला मिळते. त्यासाठी तुमचा चेहरा, नाव उपयोगी पडते. त्यामुळे माझं तिकीट कापलं म्हणून मी नाराज अशी कार्यपद्धती भाजपात नाही. मात्र एखाद्याचं तिकीट कापल्यानंतर माणूस म्हणून काही वेळ नारज होतो. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांच्या आयुष्यात त्या दिवशी काय प्रसंग आला होता त्याचा मी साक्षीदार आहे. मात्र त्या कुटुंबाने हे विष पचवलं आणि त्याचं यश त्यांना आज मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले.

 

भाजपमध्ये जे-जे संयम ठवतात त्यांना ‘सब्र का फल मीठा है’ याचा अनुभव येतो असे सांगत त्यांनी विनोद तावडे (Vinod Tawde),
पंकजा मुंडे (Pankaja Munde) राष्ट्रीय राजकारणात गेल्याचे सांगितले. भाजप कुणावरही उगाच अन्याय करत नाही.
काहीतरी कारण घडलेलं असतं. काळाच्या ओघात ते सर्व व्यवस्थित करण्याचा पक्षाचा प्रामाणिक प्रयत्न असतो, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Chandrakant Patil | shivaji maharaj created hindutva vote bank atalji advani modi culminated said bjp leader chandrakant patil

 

हे देखील वाचा :

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! एक दिवसानंतर आकऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, लगेच तपासा आपले स्टेटस

Sachin Vaze | मी अनिल देशमुखांना पैसे दिलेच नाहीत; सचिन वाझेनं दिली कबुली

Gold Price Today | खुशखबर ! सोने-चांदीच्या दरात झाली घसरण, जाणून घ्या आजचा 1 तोळ्याचा दर

 

Related Posts