IMPIMP

Chandrashekhar Bawankule | ‘महाविकास आघाडीतील नेतेच अजितदादांना जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत’ – चंद्रशेखर बावनकुळे (व्हिडिओ)

by nagesh
Chandrashekhar Bawankule | bjp state president chandrasekhar bawankule opinion regarding ajit dada is the leader of mahavikas aghadi

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन- विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना शुक्रवारी पत्रकार परिषदेत विचारले असता, मागील तीन महिन्यापासून अजितदादा मला भेटले नाहीत. मागील अधिवेशन काळात माझी आणि अजित पवार यांची भेट झाली होती. तसेच अजित दादांना जाणीवपूर्वक पहाटेच्या शपथविधीपासून त्यांच्या जीवनावर, त्यांच्या भूमिकेवर आणि कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील नेतेच अजितदादांना जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत. तसेच त्यांचा आणि माझा कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश (Pune Gangster Sharad Mohol’s Wife Joins BJP) झाला. यावरुन अजित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, राज्यातील एक लाख पक्षाच्या बूथवर आम्ही प्रत्येकी पंचवीस पक्षप्रवेश घेत आहोत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पक्ष कार्यालयात प्रत्येक मंगळवारी पक्षप्रवेश होत आहेत. त्यानुसारच येणाऱ्या मंगळवारी देखील साजेसा असा पक्षप्रवेश आहे. त्यामुळे मंगळवार हा भाजपचा पक्षप्रवेशाचा दिवस निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

बावनकुळे पुढे म्हणाले, मला कालच्या पक्षप्रवेशाबद्दल माहिती नाही. एखाद्या कार्य़कर्त्याबाबत मागील काळात काय झाले त्याबद्दल आमचे फार काही मत नाही. मात्र 2035 पर्य़ंत सर्वोत्तम भारताचा मोदींनी (PM Narendra Modi) जो संकल्प केला आहे. त्या संकल्पनेला जो कोणी साथ देण्यास तयार असेल, त्या व्यक्तीला आम्ही पक्षप्रवेश नाकारत नाही. त्या कार्यकर्त्यांने पक्षाच्या शिस्तीत आणि देशासाठी काम केले पाहिजे, अशी भूमिका स्वाती मोहोळ यांच्या पक्ष प्रवेशावर बावनकुळे यांनी मांडली.

 

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यावर भाजपचा पोपट अशी टीका केली आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) कौतुक केले की त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. उद्धव ठाकरेंच्या कामावर टीका केल्यावर ते भाजपचे पोपट होतात. त्यामुळे राज ठाकरे भाजपचे कधी पोपट होऊ शकतात का, असा सवाल करत आमचे कधी चुकले तर त्या विरोधात देखील राज ठाकरे टीका करत असतात. कधी ते आमच्या नेतृत्वावर देखील टीका करतात. त्यांची टीका टेक्निकल असते हवेत गोळीबार केल्यासारखी नसते, असे बावनकुळे यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Chandrashekhar Bawankule | bjp state president chandrasekhar bawankule opinion regarding ajit dada is the leader of mahavikas aghadi

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | अत्याधुनिक तंत्रज्ञानातून पारदर्शक आणि गतिमान सेवा पुरवाव्यात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

MP Sanjay Raut | अजित पवार म्हणाले ‘कोण संजय राऊत?’, आता राऊत म्हणतात ‘अजित पवार गोड माणूस’

Ajit Pawar | ‘शरद पवारांच्या सांगण्यावरुनच अजित पवार यांना संजय राऊत मविआतून बाहेर…’, भाजप खासदाराचा मोठा दावा

 

Related Posts