IMPIMP

MP Sanjay Raut | अजित पवार म्हणाले ‘कोण संजय राऊत?’, आता राऊत म्हणतात ‘अजित पवार गोड माणूस’

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut reaction after ajit pawar say who is sanjay raut in press conference pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते (NCP) अजित पवार (Ajit Pawar) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay
Raut) यांच्यात शाब्दीक चकमक चांगलीच रंगली आहे. शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर
देताना कोण संजय राऊत? असं उत्तर अजित पवार यांनी दिलं होतं. अजित पवारांच्या विधानावर संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले.

 

अजित पवार यांच्या विधानावर संजय राऊत (MP Sanjay Raut) पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले, (Ajit Pawar) अजित पवार आणि माझ्यात चांगले संबंध आहेत. आम्ही परवा एकाच टेबलावर बसून जेवलो आहोत. अजित पवार एखाद्या स्वीट डिशप्रमाणे आहेत. ते गोड माणूस आहेत. जर, अजित पवार रागावले असतील तर चालेल. माणसाने मन मोकळं केलं पाहिजे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार आणि माझ्यात कोणताही वाद नाही. पवार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तिशी माझा वाद नव्हता आणि नाही. अजित पवार हे मविआतील (Mahavikas Aghadi) प्रमुख स्तंभ आणि नेते आहेत. भाजप (BJP) लावालावी करण्याचे काम करत असेल, तर तुमचा डाव यशस्वी होणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं.

 

खारघरमधील घटनेबाबत (Kharghar Incident) बोलताना राऊत म्हणाले, खारघरच्या घटनेत पन्नासच्या आसपास साधकांचा मृत्यू झाला आहे. त्याची स्वतंत्रपणे चौकशी झाली पाहिजे. अजित पवारांनी न्यायालयीन चौकशीची (Judicial Inquiry) मागणी केली आहे. तसेच नाना पटोले (Nana Patole) यांनी या घटनेवर चर्चा करण्यासाठी विधानसभा अधिवेशन (Assembly Session) बोलवण्याची मागणी केली आहे. ते देखील बोलवलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

 

 

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut reaction after ajit pawar say who is sanjay raut in press conference pune

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘शरद पवारांच्या सांगण्यावरुनच अजित पवार यांना संजय राऊत मविआतून बाहेर…’, भाजप खासदाराचा मोठा दावा

Maharashtra Political News | ‘काही तरी शिजतंय… महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार’, राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

Arcelor Mittal Nippon Steel India (AM/NS India) | अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील कंपनी महाराष्ट्रात करणार ८० हजार कोटींची गुंतवणूक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कंपनीच्या शिष्टमंडळाची प्राथमिक चर्चा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : वाकड पोलिस स्टेशन – काळेवाडीत 14 वर्षीय मुलीचा खोलीत कोंडून कपडे फाडून विनयभंग, ‘प्रिन्स’ला अटक

 

Related Posts