IMPIMP

Ajit Pawar | ‘शरद पवारांच्या सांगण्यावरुनच अजित पवार यांना संजय राऊत मविआतून बाहेर…’, भाजप खासदाराचा मोठा दावा

by nagesh
Ajit Pawar | bjp mp anil bonde serious allegation on sanjay raut he said ajit pawar will be kicked out from mva

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपात (BJP) जाणार असल्याच्या चार्चांना
उधाण आलं आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी मी कुठेही जाणार नाही, राष्ट्रवादीच (NCP) राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र
त्यानंतरही चर्चा थांबताना दिसत नाहीत. तसेच संजय राऊत (MP Sanjay Raut) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) असा सामना सध्या राज्यात
रंगल्याचे पाहायला (Maharashtra Political News) मिळत आहे. अशातच भाजप खासदार अनिल बोंडेंनी (BJP MP Anil Bonde) एक मोठा दावा
केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

अनिल बोंडे म्हणाले, संजय राऊत यांच्याबद्दल सर्वांनाच माहित आहे. शिवसेनेतील 40 आमदार (Shivsena MLA) फुटले ते संजय राऊत यांच्यामुळेच.अजित पवारही (Ajit Pawar) राऊत यांना कंटाळून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सोडतील. शिवसेना फोडण्यासाठी जसे राऊत जबाबदार आहेत. तसेच महाविकास आघाडी फोडण्यासाठी संजय राऊतच जबाबदार ठरतील. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सांगण्यावरुनच अजित पवार यांना संजय राऊत महाविकास आघाडीतून बाहेर काढतील, असा खळबळजनक दावा बोंडे यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बोंडे पुढे म्हणाले, आधी चाळीस आमदारांना बाहेर काढलं आता अजित पवारांनाही बरोबर आयडियाने बाहेर काढल जाईल. संजय राऊतांनी जसं सांगितलं आहे तसेच वागत आहेत. ते परवा म्हणाले, मी फक्त शरद पवारांच ऐकतो. आधी शरद पवारांच्या सल्ल्याने शिवसेना फोडली आता महाविकास आघाडी फोडतील. हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने चाललं आहे. राज्यातील जनतेची करमणूक होत आहे, असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title :-  Ajit Pawar | bjp mp anil bonde serious allegation on sanjay raut he said ajit pawar will be kicked out from mva

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | ‘काही तरी शिजतंय… महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार’, राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

Arcelor Mittal Nippon Steel India (AM/NS India) | अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील कंपनी महाराष्ट्रात करणार ८० हजार कोटींची गुंतवणूक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कंपनीच्या शिष्टमंडळाची प्राथमिक चर्चा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : वाकड पोलिस स्टेशन – काळेवाडीत 14 वर्षीय मुलीचा खोलीत कोंडून

कपडे फाडून विनयभंग, ‘प्रिन्स’ला अटक

MP Supriya Sule | ‘त्या’ प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंनी मानले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार, म्हणाल्या…

 

Related Posts