IMPIMP

Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

by nagesh
Maratha Reservation | shinde govt filed curative petition supreme court for maratha reservation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केलं होतं. त्यानंतर राज्य सरकार (State Government) आणि मराठा समन्वयक विनोद पाटील (Maratha Coordinator Vinod Patil) यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका (Reconsideration Petition) दाखल केली होती. गुरुवारी (दि.20) सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली होती. यातच आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिका फेटाळली. त्यामुळे राज्यातील मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय सध्यातरी अधांतरी आहे. त्यानंतर आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबंधी क्युरेटिव्ह पिटिशन (Curative Petition) दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून ज्या गोष्टी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयासमोर मांडता येऊ शकल्या नाहीत त्या गोष्टी क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या समोर मांडता येतील.

 

 

मराठा आरक्षणाबाबत शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil), मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse), मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), उदय सामंत (Uday Samant), आणि इतर मंत्री उपस्थित होते.

 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची कार्यवाही त्वरित केली जावी. याशिवाय मराठा समाजाचे मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी विस्तृत सर्वे करावा लागेल. हा सर्वे करताना नेमण्यात येणारी संस्था सुद्धा निष्पक्ष, कार्यक्षम असणे गरजेचे आहे. या संस्थेस सर्व प्रकारच्या सुविधा, मनुष्यबळ, प्रशासनाचे सहकार्य उपलब्ध करुन देण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maratha Reservation | shinde govt filed curative petition supreme court for maratha reservation

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MP Sanjay Raut | अजित पवार म्हणाले ‘कोण संजय राऊत?’, आता राऊत म्हणतात ‘अजित पवार गोड माणूस’

Maharashtra Political News | ‘काही तरी शिजतंय… महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार’, राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

 

Related Posts