IMPIMP

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंकडून मोदींचा एकेरी उल्लेख, बावनकुळे संतापले, म्हणाले- ‘बोलताना जरा तारतम्य बाळगा’ (व्हिडिओ)

by nagesh
Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule angry at uddhav thackeray over disrespect of pm narendra modi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Chandrashekhar Bawankule | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray Group Chief Uddhav Thackeray) यांची रविवारी जळगावमधील पाचोऱ्यात सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) लक्ष्य केलं. मोदींचा एकेरी उल्लेख करत ठाकरे म्हणाले, तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय? या टीकेनंतर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. कुठे सुर्य आणि कुठे तुम्ही, बोलताना जरा तारतम्य बाळगा, असा इशारा बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

असंतोष कधीही भडकेल

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पुढे म्हणाले, पंतप्रधानांचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील आणि त्यांची मशाल विझेल. ते पंतप्रधानांना घाबरतात व त्यातूनच ते संभ्रमावस्थेत बोलत आहेत. ठाकरे यांनी सार्वजनिक मंचावरुन व्यक्तिगत टीका करु नये. ते वारंवार मोदीवर टीका करत असून यामुळे असंतोषाचा स्फोट होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.

 

 

बोलताना व्यक्तिगत टीका करु नका

मागेही मी सांगितलं होतं, सार्वजनिक ठिकाणी बोलताना व्यक्तिगत टीका करु नका. त्यांनी आमच्या नेतृत्वाचा अपमान करु नये. स्फोट होईल एखाद्या दिवशी. तुम्ही आमच्या नेतृत्वाचा एकेरी उल्लेख करताय, यामुळे एक दिवस स्फोट होऊ शकतो. मी मागेही सांगितले होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल बोलताना तारतम्य बाळगा, असंतोष कधी भडकेल हे मला माहिती नाही, असे बावनकुळे म्हणाले.

 

 

आपल्या उंचीचा तरी विचार करावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांनी एकेरी उल्लेख करण्याअगोदर त्यांनी अभ्यास करुन बोलायला हवं. मोदींसमोर आपली उंची काय याचा तरी ठाकरे यांनी विचार करावा. उद्धव ठाकरे पक्ष सांभाळू शकले नाहीत. ज्या पंतप्रधानांचे नाव घेऊन निवडून आले त्यांचीच खिल्ली उडवत आहेत. ही बेईमानीच आहे. उद्धव ठाकरे लोकांना संस्कार शिकवतात व प्रत्यक्ष अशी भाषा वापरतात. भाजपच्या कार्यकर्त्यांनी किती दिवस संयम पाळायचा, असा सवाल बावनकुळे यांनी केली. बाजारसमिती निवडणुकीनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात भाजपत इनकमिंग होणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरद पवारही ठाकरेंना कंटाळले

अजित पवारांना (Ajit Pawar) शिवसेनेचे लोकच बदनाम करत आहेत. अजित पवारांशी कित्येक दिवसांत प्रत्यक्ष भेट देखील झालेली नाही. शिवसेनेचे लोक त्यांच्याबाबत अफवा पसरवत आहेत. महाविकास आघाडीतच धुसफूस सुरु असून शरद पवार (Sharad Pawar) हे देखील या प्रकाराला कंटाळले आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.

 

 

Web Title :-  Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule angry at uddhav thackeray over disrespect of pm narendra modi

 

हे देखील वाचा :

Dr. Nivedita Bhide | ‘गोष्टी, गोष्टी,पन्नास गोष्टी !’ पुस्तक संचाचे प्रकाशन – गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे

Ajit Pawar | ‘मविआत शक्य नाही, अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आमच्यासोबत यावे’, केंद्रीय मंत्र्याची ऑफर

Pune Crime News | पुणे-लोहगाव क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – महिलेचा हात पिरगाळुन गाऊन फाडला, अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी दोंघाविरूध्द गुन्हा

Sahil Pandurang Margaje | धनकवडी : जिल्हास्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत साहिल मरगजेची नेत्रदीपक कामगिरी; वरिष्ठ गटात पटकावली 7 पदके

 

Related Posts