IMPIMP

Sahil Pandurang Margaje | धनकवडी : जिल्हास्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत साहिल मरगजेची नेत्रदीपक कामगिरी; वरिष्ठ गटात पटकावली 7 पदके

by nagesh
Sahil Pandurang Margaje | Dhankawadi : Spectacular performance of Sahil Margaje in district level gymnastics competition; Won 7 medals in senior category

पुणे (अनिल पाटणकर) : सरकारसत्ता ऑनलाईन- Sahil Pandurang Margaje | येथील धनकवडी (Dhankawadi) भागात राहणाऱ्या साहील पांडुरंग मरगजे (Sahil Pandurang Margaje) याने कोथरूड (Kothrud) येथे झालेल्या जिल्हास्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेमध्ये (Gymnastics Competition In Pune) आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर विविध प्रकारात तब्बल ७ पदके मिळविण्यात यश संपादन केले आहे.

 

पुणे जिल्हा जिमनॅस्टिक असोसिएशन (Pune District Gymnastics Association) यांचे वतीने कोथरूड येथे २२ आणि २३ एप्रिलला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत साहिलने फ्लोअर प्रकारात प्रथम, पोमेल हाॅर्स प्रकारात द्वितीय, रोमन रिंग्ज प्रकारात द्वितीय, व्हाॅल्ट प्रकारात तिसरे, पॅरलल बार प्रकारात तिसरे, होरिझंटल बार प्रकारात पहिले आणि आँलराऊंडर प्रकारात तिसरे याप्रमाणे एकूण सात पारितोषिके पटकावली आहेत. त्यामुळे त्याचेवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Sahil Pandurang Margaje)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

साहिल पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स Marathwada Mitra Mandal College of Commerce (MMCC) येथे वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असून मागील ९ वर्षांपासून तो जिमनँस्टिक्सचे प्रशिक्षण घेत आहे.यापूर्वी त्याने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावताना २०१९ मध्ये नँशनल स्पर्धेत द्वितीय क्रमांकासह नॅशनल चॅम्पियन  जिम्नॅस्टिक प्लेयर म्हणून नावलौकिक मिळविला होता. सध्या तो राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते, सहायक पोलीस निरीक्षक,सौरभ कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एसके जिमनॅस्टिक्स अँकॅडमीमध्ये जिमनँस्टिकचा सराव करीत आहे.

 

साहिल बरोबरच एस के जिमनँस्टिक अँकडमीच्या तब्बल ३८ विद्यार्थीनी पदके जिंकली यामध्ये ८ गोल्ड, १४ सिल्व्हर आणि १६ ब्राँझ पदकांचा समावेश आहे यामध्ये वरिष्ठ गटात हेरंब चव्हाण याने सहा तर कनिष्ठ गटात कौशल्य राठी व कौस्तुभ बेरी दोघांनीही प्रतेकी सात पदके पटकावली.

 

 

Web Title :- Sahil Pandurang Margaje | Dhankawadi : Spectacular performance of Sahil Margaje in district level gymnastics competition; Won 7 medals in senior category

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil On SRA In Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा

Maharashtra Political News | एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार?, दिल्लीत हालचाली सुरू; संजय राऊतांचा दावा

Gulabrao Patil | ‘राजीनामा देण्याइतकी संजय राऊतांची लायकी नाही’, गुलाबराव पाटलांची सडकून टीका

Maharashtra Police Accident | बारसू रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात, 17 पोलीस जखमी

 

Related Posts