IMPIMP

Chinchwad Bypoll | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत कोण असणार भाजपचा संभाव्य उमेदवार?; याबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिले संकेत

by nagesh
Chinchwad Bypoll | pimpri chinchwad bypoll election who will bjp candidate chandrakant patil gave hint

चिंचवड : सरकारसत्ता ऑनलाईन   – Chinchwad Bypoll | दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त
झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची (Chinchwad Bypoll) तारिख निवडणुक आयोगाकडून जारी करण्यात आली आहे.
त्यानुसार पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघाची पोटनिवडणुक ही २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यावर आज भाजपकडून (BJP)
चिंचवड मतदारसंघातील तयारीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी
माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चिंचवड मतदार संघातून भाजपचा संभाव्य उमेदवार कोण असेल? याचे संकेत दिले. (Chinchwad Bypoll)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पिंपरी चिंचवड मधील नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या प्रश्नातच याचं उत्तर दडलं आहे. येथे लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. असे सुचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केल्याने अनेकांच्या मनातील संभ्रम दूर झाला. त्यावरून चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातीलचं व्यक्ती असणार आहे. अशी शक्यता कार्यकर्त्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

 

तसेच यावर पुढे बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, ‘आमचे नेते स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घोषित झाली आहे. मी भाजपाच्या ‘पूर्व तयारी बैठकी’ ला आलो होतो.
लक्ष्मण जगताप केवळ आमदार नव्हते. ते आमचे नेते होते. महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचा ते आधार होते.
२६ फेब्रुवारीला ही पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सगळ्यांचा प्रयत्न आहे.’
असे चंद्रकांत पाटील म्हणाले. (Chinchwad Bypoll)

 

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘पण भारतीय जनता पार्टी ‘पुरेसा आधी विचार करा आणि पुरेसा परिपूर्ण विचार करा’ अशा कार्यपद्धतीची आहे. त्यामुळे गाफील न राहता या निवडणुकीच्या पूर्वतयारी बैठकीला मी आलो.
उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक नव्हती. उमेदवार ठरवण्यासाठी भाजपाची प्रक्रिया ठरलेली आहे.
इच्छुकांची नावं प्रदेशाकडे जातात. प्रदेशाची एक कोअर कमिटी आहे.
त्यानंतर ही नावं केंद्रीय संसदीय बोर्डाकडे जातात. त्यानंतर दिल्लीतून निर्णय घोषित होतो.
ही उमेदवार ठरवणारी बैठक नव्हती.’ असं म्हणत त्यांनी उमेदवारीबाबत कमालीची गुप्तता पाळली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘उमेदवार कोण असावा? याचा निर्णय आमची प्रांताची कोअर कमिटी ठरवते.
त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं बरोबर नाही.
पण पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्याच्या प्रश्नामध्येच उत्तर दडलं आहे.
भाऊंच्या (लक्ष्मण जगताप) कुटुंबाबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं काहीही कारण नाही.’
असं सूचक वक्तव्य देखील यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केले.

 

 

Web Title :- Chinchwad Bypoll | pimpri chinchwad bypoll election who will bjp candidate chandrakant patil gave hint

 

हे देखील वाचा :

Ambadas Danve | ‘सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी जर विजयाचा जल्लोष करत असतील, तर शंकेला वाव,’ ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला सवाल

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी, इव्हानो इलेव्हन संघांची विजयाची हॅट्रीक !!

Pune Crime News | सुडाच्या भावनेतून चार भाऊ बनले हैवान, चिमुकल्यांसह 7 जणांची केली ‘अशी’ हत्या; पोलीस तपासात धक्कादायक कारण आलं समोर

 

Related Posts