IMPIMP

Ambadas Danve | ‘सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी जर विजयाचा जल्लोष करत असतील, तर शंकेला वाव,’ ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला सवाल

by nagesh
Ambadas Danve | opposition leader ambadas danve criticized the shinde group accused of claiming victory before court verdict

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन   – Ambadas Danve | शिवसेना पक्षाबाबत सध्या सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court Of India) घटनापुढे
सुनावणी सुरू असून निवडणुक आयोगापुढे देखील पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव याबाबत सुनावणी सुरू आहे. अंतिम निकाल येणं अजून बाकी आहे. असं
सगळं असताना देखील निकाल आमच्या बाजुने लागणार असे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. त्यावर शंकेला वाव असल्याचे म्हणतं ठाकरे गटाचे
नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रश्न उपस्थित केला. ते औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, ‘शिवसेना पक्ष कोणाचा याबाबत न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. असं म्हणत त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य केले. तसेच, १६ लोकांनी पक्ष भंग केला आहे. त्यामुळे कारवाई होईल किंवा न्यायालय काय निकाल देईल हे सांगता येत नाही. यामुळे मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाही. तसेच सुनावणी सुरु असताना आधीच निकाल आमच्याच बाजूने लागणार असल्याचा दावा करत असतील तर शंकेला वाव असल्याचं दानवे म्हणाले. तसेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार १६ जणांवर कारवाई व्हावी हाच कायदा असल्याचं देखील यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले.’

 

तसेच पुढे बोलताना अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडीवर केलेला आरोप देखील फेटाळून लावला.
यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, ‘याबाबत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
(Dilip Walse-Patil) यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस यांना जेलमध्ये टाकण्यासाठी कोणतेही षडयंत्र रचण्यात आलेले नव्हतं. असे षडयंत्र भाजपकडून (BJP) करण्यात येते. ईडीच्या माध्यमातून भाजपने हे असले प्रयत्न केले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सांमज्यसाने काम करतात. पक्षातील ५० लोकं निघून गेले, मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना देखील आपलं वजन वापरले नाही. ते आपलं वजन वापरू शकत होते, मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे अशा आरोपात तथ्य नाही.’ असे देखील यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, राज्यात विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन योजना हा मुद्दा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे.
त्यावर रविवारी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक
असल्याची घोषणा केली. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकांची (Legislative Council Election)
आचारसंहिता राज्यात सुरू असताना मुख्यमंत्री यांनी अशी घोषणा करणे म्हणजे आचारसंहिता भंग
करण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी केला.

 

Web Title :- Ambadas Danve | opposition leader ambadas danve criticized the shinde group accused of claiming victory before court verdict

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी, इव्हानो इलेव्हन संघांची विजयाची हॅट्रीक !!

Pune Crime News | सुडाच्या भावनेतून चार भाऊ बनले हैवान, चिमुकल्यांसह 7 जणांची केली ‘अशी’ हत्या; पोलीस तपासात धक्कादायक कारण आलं समोर

 

Related Posts