IMPIMP

Cholesterol Symptoms | कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढल्यानंतर शरीर देते असे संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

by nagesh
Heart Attack Risk Factors | heart attack risk factors change these 3 bad habits weight control smoking physical inactivity

सरकारसत्ता ऑनलाइन –  Cholesterol Symptoms | प्रत्येकाला निरोगी आणि दीर्घायुष्य जगायचे असते. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक आजार अकाली जडतात. आपले शरीर आपल्याला आधीच काही संकेत देत, जेणेकरून आपण सावध व्हावे. शरीराने दिलेले संकेत समजून घेतल्यास कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर समस्या टाळता येतात. रक्तातील हाय कोलेस्ट्रॉल (High cholesterol) ही धोक्याची घंटा आहे. (Cholesterol Symptoms)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, (High Blood Pressure, Heart Attack,) कोरोनरी आर्टरी डिसीज, ट्रिपल वेसल डिसीज यांसारखे आजार होण्याची भीती असते. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यावर शरीर कोणते संकेत देते ते जाणून घेऊया.

 

1. पाय सुन्न होणे (Numbness in legs)
कोलेस्ट्रॉल वाढले की पाय अचानक सुन्न होतात. शिरांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे पायांना होणारा रक्तपुरवठा थांबतो किंवा कमी होतो. (Cholesterol Symptoms)

 

2. हृदयविकाराचा झटका (Heart Attack)
हृदयविकाराचा झटका हे हाय कोलेस्ट्रॉलच्या धोकादायक लक्षणांपैकी एक आहे. प्रथम, रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे, दाब वाढू लागतो, जो नंतर हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनतो.

3. उच्च रक्तदाब (High Blood Pressure)
उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी दर्शवतो. हे शोधणे सोपे आहे. तुमचा बीपी वेळोवेळी तपासत राहा.

 

4. नखांचा रंग बदलणे (Nail Color Change)
रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढले की रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नखांचा रंग पिवळा होऊ लागतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

5. अस्वस्थता
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की चिंता वाढते. यासोबतच श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ होणे, थकवा येणे, छातीत दुखणे असे प्रकार जाणवतात. अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cholesterol Symptoms | bad high cholesterol symptoms and causes numbness nail colour change heart attack high blood pressure

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde Group | 65:35 चा फॉर्म्युला, पण महत्त्वाच्या खात्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा तिढा ?

Sanjay Raut On Bhagat Singh Koshyari | संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा, म्हणाले – ‘105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाईंनी देखील केला नव्हता’

Milk and Banana | बनाना-मिल्क शेक आरोग्यासाठी ठरू शकतो घातक, ‘हे’ सत्य जाणून घेतले तर तुम्हीही बदलाल सवय

 

Related Posts