IMPIMP

CM Eknath Shinde | ‘वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत …’, एकनाथ शिंदेचे बोचरे ट्विट

by nagesh
CM Eknath Shinde | eknath shindes strongest tweet ever on uddhav thackeray shivsena political crisis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तीन दिवसांच्या साताऱ्यातील त्यांच्या गावी गेले होते. यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. गावावरुन आल्यानंतर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता एक ट्विट केले असून हे ट्विट आजवरचे सर्वाधिक बोचरे ट्विट आहे. दरम्यान, बारसूतील (Barsu Refinery Project) संघर्ष वाढत असताना मुख्यमंत्री स्वत:च्या शेतात जातात. शेतात स्ट्रॉबेरी किती लागली, ते पाहत बसतात, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्र सोडलं होतं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एकनाथ शिंदे ट्विटमध्ये काय म्हणाले?
काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात, अशी टीका एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे.

 

जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे…, असा टोला त्यांनी लगावला.

 

केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | eknath shindes strongest tweet ever on uddhav thackeray shivsena political crisis

 

हे देखील वाचा :

ACB Trap News | मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी 18 हजाराची लाच घेणारा डॉक्टर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Abdul Sattar | उद्धवजी… संजय राऊतांच्या मेंदूची तपासणी करुन घ्या, अब्दुल सत्तारांचा सल्ला

Karnataka Elections 2023 | कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी 2500 कोटींचा लिलाव, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

 

Related Posts