IMPIMP

CM Eknath Shinde | ‘सध्या डबल ड्युटीवर आहे, अडीच वर्ष घरात बसणाऱ्यांनी बोलू नये’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

by nagesh
 CM Eknath Shinde | i am not vacation i am on double duty said by cm eknath shinde on uddhav thackeray in satara

वाई/सातारा :  सरकारसत्ता ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या त्यांच्या गावी आले आहेत. यावरुन विरोधकांनी टीका केली आहे. विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी सध्या सुट्टीवर नाही तर सध्या डबल ड्युटीवर आहे. अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी मला सांगू नये, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) नाव न घेता लगावला. मुख्यमंत्री शिंदे हे सातारा येथे त्यांच्या दरे (महाबळेश्वर) गावी आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, लोक भेटायला येतात. जनता दरबार घेतला. शेतातही जातोय, शेतीची कामेही बघतोय. सातारा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. महाबळेश्वर पाचगणी पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण आदी अनेक कामांची बैठक घेत आहे. आगामी निवडणुका कोणाच्या नेतृत्वात लढवल्या जाणार यावर बोलताना ते म्हणाले की, अजून आम्ही दीड वर्षे काम करणार आहोत. महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकांना (Election-2024) सामोरे जाणार आहोत. चिंता करु नका. गेले सात आठ महिने आम्ही जे काम केले आहे. त्यामुळे काहीजणांच्या पोटात दुखत असल्याची टीका त्यांनी केली.

 

आम्ही टीकेतून नाही तर…
उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या होणाऱ्या टीकेला आम्ही टीकेतून नाही तर कामातून उत्तर देत आहोत. मी कधीही सुट्टी घेतली नाही. आता मी डबल ड्युटी करतो आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्यांना घरी बसवलं ना. त्यांच्याकडे आता काहीच काम नाही. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

 

मुख्यमंत्रीपद गेल्याने रिफायनरीला विरोध
स्थानिक नागरिकांच्या संमतीशिवाय बारसु रिफायनरी प्रकल्प (Barsu Refinery Project) केला जाणार नाही. रेटून आणि अन्याय करुन हा प्रकल्प केला जाणार नाही. केवळ त्यांचे मुख्यमंत्रीपद गेल्याने विरोध करायचा म्हणून हे सगळं चालले आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. त्यामुळे दोन वर्षे घरी बसलेल्यांनी आमच्यावर बोलावे, हे नवलच आहे, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर केली. हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प असून यामुळे कोणतेही प्रदूषण (Pollution) होणार नाही याची हमी आपल्याला दिली असल्याचे देखील शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आता विरोध का?
बारसू रिफायनरीसाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले होत.
त्यामुळेच पंतप्रधानांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला होता. ठाकरेंनी त्यावेळेस का विरोध केला नाही. त्यावेळी विशिष्ट परीस्थिती होती की विशिष्ट तडजोडी झाल्या होत्या. आता मुख्यमंत्री पद गेल्यावर विरोध करण्याचे कारण काय? असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना विचारला आहे. चांगल्या कामाला विरोध करणे हा दुटप्पीपणा असल्याची टीका देखील त्यांनी ठाकरेंवर केली.

 

Web Title :- CM Eknath Shinde | i am not vacation i am on double duty said by cm eknath shinde on uddhav thackeray in satara

 

हे देखील वाचा :

Pune Crime Accident News | निवृत्त पोलिसाच्या गाडीला डंपरची धडक, फरफटत नेल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू; वाघोलीमधील घटना

Reshim Sheti Yojana Maharashtra | रेशीम शेती उद्योगाच्या वाढीसाठी ‘शासन आपल्या दारी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा जिल्ह्यात शुभारंभ

Maharashtra Political News | शरद पवार भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच करु, भाजपच्या मंत्र्याचं सूचक विधान

Jalyukt Shivar Yojana Maharashtra | जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

 

Related Posts