IMPIMP

Maharashtra Political News | शरद पवार भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच करु, भाजपच्या मंत्र्याचं सूचक विधान

by nagesh
Maharashtra Political News | if sharad pawar and ajit pawar come with bjp we are ready to welcome them says sudhir mungantiwar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political News | भाजप (BJP) हा देशाच्या प्रगतीसाठी काम करणारा पक्ष आहे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या लोकांनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली, त्या सर्वांना पक्षात सामावून घेण्याची भूमिका असते. त्यामुळे उद्या अजित पवार (Ajit Pawar) काय तर शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केलली तर त्यांचेही स्वागत असेल, असे विधान राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलं. आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तसेच भविष्यात (Maharashtra Political News) राष्ट्रवादीसोबत (NCP) एकत्र येण्यास भाजपला कोणतीही अडचण नसल्याचे संकेत त्यांनी दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही नवा बदल अपेक्षित नाही. (Maharashtra Political News) कधी कधी वेगळी हवा, धुकं पसरतं. या धुक्याच्या मागे काहीतरी अघटित घडतंय, असं आपल्याला वाटतं. हे एक राजकीय धुकं आहे. दोन-तीन दिवसांत दूर होईल, तेव्हा सगळं स्पष्ट होईल.

 

2024 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक (Election-2024) लढवली जाईल. ही गोष्ट आमच्या पक्षाचे राज्यातील एक नंबरचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केली आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर या मुद्यावर फार बोलण्यात अर्थ नाही, असे सांगत मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना अर्थ नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

यावेळी अजित पवार यांच्या भाजपसोबतच्या युतीबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी ज्या ज्या लोकांनी इच्छा व्यक्त केली, भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतली, त्या सगळ्यांना पक्षात सामावून घेतले जाते. भाजप एका कुटुंबापुरता मर्यादित असलेला पक्ष नाही. त्यामुळे अजित पवार आमच्या सोबत आले तर स्वागत करणार का असा प्रश्न असेल,
तर मी सांगेन उद्या शरद पवारही भाजपमध्ये आले, ते येणार नाहीत, पण ते भाजपला पाठिंबा द्यायला तयार झाले किंवा उद्या जयंत पाटील (Jayant Patil) भाजपमध्ये येणार असतील तर स्वागतच करु, असे विधान मुनगंटीवार यांनी केलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Political News | if sharad pawar and ajit pawar come with bjp we are ready to welcome them says sudhir mungantiwar

 

हे देखील वाचा :

Jalyukt Shivar Yojana Maharashtra | जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

Nira Ujwa Kalwa | नीरा उजव्या कालव्याची 19 जूनपर्यंत सलग दोन आवर्तने; कालवे सल्लागार समिती बैठकीत निर्णय

Sudhir Mungantiwar | ‘मुंबईत इमारती कोसळतात तेव्हा BMC वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो का?’, खारघर दुर्घटनेवर सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण

DG Insignia Award Maharashtra Pune Police | महाराष्ट्र पोलिस दलातील 800 पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह ! पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, CID, SRPF मधील 84 जणांचा समावेश

 

Related Posts