IMPIMP

Jalyukt Shivar Yojana Maharashtra | जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

by nagesh
Jalyukt Shivar Yojana Maharashtra | Jalyukta Shivar is a big success, Maharashtra is first in water conservation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- Jalyukt Shivar Yojana Maharashtra | केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने (Union Ministry of Jal Shakti) भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे. (Jalyukt Shivar Yojana Maharashtra)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे, हे सांगताना मला अत्यानंद होतो. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचे हे यश आहे. अन्य राज्यात तळी आणि जलसाठे अधिक असली तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. 2018-19 या वर्षात ही गणना करण्यात आली होती. या अहवालातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधील आहेत. (Jalyukt Shivar Yojana Maharashtra)

 

जलयुक्त शिवार आणि अन्य जलसंवर्धनाच्या योजनांना लोकचळवळ बनविणार्‍या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, सामाजिक संघटनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले असून, या कार्यात सहभागी सर्वांचे आभार सुद्धा मानले आहेत. हे आपल्या सर्वांचे सामूहिक यश आहे. आता जलयुक्त शिवार 2.0 अभियान सुद्धा असेच सर्वांनी यशस्वी करावे, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

 

(जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल : संदर्भासाठी लिंक : https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1919726 )

 

Web Title :- Jalyukt Shivar Yojana Maharashtra | Jalyukta Shivar is a big success, Maharashtra is first in water conservation

 

हे देखील वाचा :

Nira Ujwa Kalwa | नीरा उजव्या कालव्याची 19 जूनपर्यंत सलग दोन आवर्तने; कालवे सल्लागार समिती बैठकीत निर्णय

Sudhir Mungantiwar | ‘मुंबईत इमारती कोसळतात तेव्हा BMC वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो का?’, खारघर दुर्घटनेवर सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण

DG Insignia Award Maharashtra Pune Police | महाराष्ट्र पोलिस दलातील 800 पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह ! पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, CID, SRPF मधील 84 जणांचा समावेश

 

Related Posts