IMPIMP

CM Eknath Shinde On Marine Drive | मरीन ड्राईव्ह परिसरात पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्याव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रसाधनगृह, आसन व्यवस्था, स्वच्छता, सुशोभीकरण यासाठी मुंबई महानगरपालिका करणार उपाययोजना; सी साईड प्लाझा आणि लेझर शो देखील आयोजित होणार

by nagesh
CM Eknath Shinde On Marine Drive | International standard facilities should be provided to tourists in the Marine Drive area - Chief Minister Eknath Shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – CM Eknath Shinde On Marine Drive | देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर (Mumbaikar) नागरिकांसाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा – Seaside Plaza) तयार करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका Brihanmumbai Municipal Corporation (BMC) प्रशासनाला दिले. (CM Eknath Shinde On Marine Drive)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मरीन ड्राईव्ह परिसरात देश विदेशातून येणारे पर्यटक (Tourists Coming From Abroad) आणि मुंबईकर नागरिकांसाठी सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरण कामांचा आढावा घेणारा पाहणी दौरा मुख्यमंत्री शिंदे यांनी आज (दिनांक १ मे २०२३) केला. त्यावेळी ते बोलत होते. या परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांची तसेच उपाययोजनांची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (IAS Iqbal Singh Chahal) यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली. (CM Eknath Shinde On Marine Drive)

 

या पाहणीप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Adv Rahul Narwekar), महिला बालविकास आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा (Ashish Sharma IAS), उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे (Dr Sangita Hasnale), ए विभागाचे सहायक आयुक्त शिवदास गुरव (Shivdas Gurav) आदींसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

मुंबई महानगरात जगभरातून पर्यटक येतात. खासकरून मरीन ड्राईव्ह परिसराला सर्वच पर्यटक हमखास भेट देतात. या पर्यटकांना तसेच या परिसरात विरंगुळा म्हणून भेट देणाऱ्या मुंबईकर नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निरनिराळ्या सोयी-सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा दौरा करून महानगरपालिका प्रशासनाला निर्देश दिले. मरीन ड्राईव्ह परिसरातील सी फेसिंग इमारतींना (Sea Facing Buildings) विशिष्ट रंग देण्यात यावा. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो (International laser Show) याठिकाणी सुरू करावा, असे सांगून सध्या सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांच्या आणि स्वच्छतेच्या अनुषंगानेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध सूचना केल्या.

 

महानगरपालिकेच्या सुरू असलेल्या कामांची माहिती देताना आयुक्त श्री. चहल म्हणाले की, मरीन ड्राईव्ह मध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यात येत आहे. व्ह्युविंग डेक निर्मिती ही नियोजन विभागाकडून केली जाणार आहे. एकूण ५३ मीटर लांब व ५ मीटर रुंद असा सी साईड प्लाझा नागरिकांना चालण्यासाठी तसेच समुद्र पाहण्यासाठी जेट्टीच्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या दिशेने (सी फेस) आसन व्यवस्था रचना येत्या काही दिवसात करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांना समुद्र पाहण्यासाठी चांगली, सुखकर जागा मिळेल. त्यादृष्टीने कामाला सुरूवात करण्यात येत आहे, असेही आयुक्त श्री. चहल यांनी नमूद केले.

 

दरम्यान, मरीन ड्राईव्ह परिसरात येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर उत्कृष्ट दर्जाचे प्रसाधनगृह उभारण्यात यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर, खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व सहभागाने (सीएसआर) Corporate Social Responsibility (CSR Funds) दोन प्रसाधनगृह उभारण्यात येतील, याबाबतचे कार्यादेश लवकरच देण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी दिली.

 

 

Web Title : CM Eknath Shinde On Marine Drive | International standard facilities should be provided to tourists in the Marine Drive area – Chief Minister Eknath Shinde

 

हे देखील वाचा :

Balasaheb Thackeray Aapla Dawakhana | राज्यातील 317 तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू

Pune Rural Police – Chandrakant Patil | पुणे : पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करू – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

National Lok Adalat In Pune District | पुणे : लोकन्यायालयाद्वारे प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा महाराष्ट्रात सलग दहाव्यांदा प्रथम स्थानी

Maharashtra Din In Pune | महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन; पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

 

Related Posts