IMPIMP

Corona Cases in Pune | दिलासादायक ! पुण्यात उपचाराधीन रुग्णसंख्येत प्रचंड घट; शहरात 916 जणांवर विविध रुग्णालयात उपचार

by nagesh
corona cases in pune | number of patients undergoing treatment in pune decreased reached 9 month low

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) : कोरोनाच्या संसर्गाने (Corona Cases in Pune) मागील दीड वर्षांपासून भारताची अवस्था बिकट झाली आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसऱ्या लाटेने (second wave) तर आरोग्य व्यवस्थेचे कंबरडे मोडले. सुविधांच्या कमतरतेमुळे अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना डोळ्यादेखत जीव (deaths) सोडताना पाहिलं होतं. या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग सर्वाधिक होता त्यामुळे बाधितांची संख्यादेखील वाढत जात होती. पुण्यात तर 54 हजारांच्या पार कोरोना बाधितांचा (Corona Cases in Pune) आकडा जाऊन उच्चांक गाठला होता. मात्र आता या संख्येत प्रचंड घट झाली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

पुण्यातील दुसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या लक्षात घेता गेल्या 9 महिन्यातील सर्वात कमी संख्या सध्या पाहायला मिळत आहे. शहरात फक्त 916 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 3 नोव्हेंबर 2020 रोजी हा आकडा 880 इतका होता. उपचाराधीन रुग्णांची संख्या (patients undergoing treatment) कमी झाल्यानं पुण्यातील आरोग्य व्यवस्थेवरील बराच ताण कमी झाला आहे. पुणे शहर (Pune City) सावरत असल्याचं हे चित्र आहे. सध्या सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या अडीच हजारांच्या आसपास आहे. पण यातील 1 हजार 726 जणांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे त्यांना
घरीच विलगीकरणात (Home quarantine) ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तर अन्य 916 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

10 टक्के लोकांना कोरोनाची लागण

पुणे शहराची लोकसंख्या 45 लाख असून आतापर्यंत एकूण 4 लाख 85 हजार 855 जणांना कोरोना
विषाणूची लागण झाली आहे. म्हणजे 10 टक्क्याहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली
आहे. यातील 4 लाख 74 हजार 477 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर पुण्यात
आतापर्यंत 8 हजार 736 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. राज्यातील कोरोना विषाणूचा
पहिला रुग्ण पुण्यात 9 मार्च 2020 रोजी आढळला होता.

 

 

Web Title : corona cases in pune | number of patients undergoing treatment in pune decreased reached 9 month low

 

हे देखील वाचा :

Tokyo Olympics 2020 | मीराबाईच्या ‘चांदी’च्या झळाळीचे रेल्वे मंत्र्यांनी केले कौतूक, 2 कोटी रुपयांसह प्रमोशन देण्याची घोषणा (Video)

Pune News | ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’चे डॉ.अरुण फिरोदिया यांच्या उपस्थितीत वितरण; 7 युवा संशोधकांचा गौरव ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी संशोधने व्हावीत : डॉ अरुण फिरोदिया

Pune Crime | 29 लाखांच्या वार्षिक पॅकेजच्या नोकरीचे आमिष दाखवून 43 लाखांना घातला गंडा

 

Related Posts