IMPIMP

Corona Third Wave | राज्यात ‘कोविड’चा पीक टाईम कधी, कोरोनाची तिसरी लाट कधी ओसरणार?

by nagesh
Coronavirus in Maharashtra | Maharashtra reports 1,081 new COVID19 cases today; Active cases stand at 4,032 including 2,970 cases in Mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) संख्या वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काहीसा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) पीक पॉईंटला (Peak Point) जाईल. परंतु, याच महिन्याच्या शेवटापासून कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) ओसरायला लागेल, असा निष्कर्ष भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute of Science) आणि भारतीय सांख्यिकी संस्थेच्या (Indian Statistical Institute) सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तिसऱ्या आठवड्यात मोठी वाढ
राज्यात सध्या ओमायक्रॉनच्या (Omycron) रुग्णांची संख्या 48 तासांत दुप्पट होत आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातील कोरोनाचा संसर्ग शिगेला पोहोचेल. यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्ये घट होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Corona Third Wave)

लस न घेतलेल्यांना अधिक धोका
कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या लोकांना तिसऱ्या लाटेचा अधिक धोका असल्याचे संकेत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी दिले. त्यांनी सध्या मुंबईत ऑक्सीजन बेडवर (Oxygen Bed) असलेल्या रुग्णांची आकडेवारी सादर केली. यामध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण असे आहेत की, ज्यांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे सहाजिकच ज्या नागरिकांचे लसीकरण (Vaccination) झालेले नाही. त्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे चहल यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
यादृष्टीने आरोग्य खाते आणि टास्क फोर्सकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना सर्व माहिती दिली आहे.
त्यामुळे आता राज्यात निर्बंध लागू करायचे का नाही याबाबत तेच अंतिम निर्णय घेतली, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
कोरोना संक्रमण थांबले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रकारच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे टोपे यांनी सांगितले.

 

Web Title :- Corona Third Wave | corona third wave peak time in maharashtra when covid patients numbers will reduced know more

 

हे देखील वाचा :

PM kisan | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता तुम्हाला दरवर्षी 6000 बरोबर 36000 रुपये मिळतील, तात्काळ करा ‘हे’ काम

Pimpri Corona | चिंतेत वाढ ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1000 हून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Benefits Of Tulsi | ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी हिवाळ्यात तुळशीचे सेवन होऊ शकते परिणामकारक, जाणून घ्या 5 जबरदस्त फायदे

 

Related Posts