IMPIMP

Pimpri Corona | चिंतेत वाढ ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1000 हून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In the last 24 hours 32 patients in Pimpri Chinchwad are corona free find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण वाढत असताना ओमिक्रॉनचे (Omicron variant) रुग्ण आढळून येत असल्याने पिंपरी चिंचवडकरांची चिंता वाढली आहे. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये 5 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 1073 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 10 हजार 212 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1073 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 83 हजार 402 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 43 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 75 हजार 441 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरामध्ये सध्या 4164 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 378 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3787 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शहरात 5 ओमिक्रॉनचे रुग्ण
पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 05 नवीन ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहे. 5 रुग्णांमध्ये 1 महिला, 4 पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण रॅन्डम तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सर्व रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज 63 रुग्णांची पुन्हा 10 व्या दिवशी चाचणी करण्यात आली. यामध्ये त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

 

दिवसभरात 18,148 जणांचे लसीकरण
आज शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 18 हजार 148 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 30 लाख 58 हजार 970 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pimpri Corona | Increased anxiety! More than 1000 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Benefits Of Tulsi | ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी हिवाळ्यात तुळशीचे सेवन होऊ शकते परिणामकारक, जाणून घ्या 5 जबरदस्त फायदे

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलियोमधून हटवला ‘हा’ स्टॉक, 1 वर्षात दिला शानदार रिटर्न, जाणून घ्या कारण

Central Railway Megablock | ठाणे ते दिवा दरम्यान 36 तासांचा मेगाब्लॉक; ठाणे ते कल्याण दरम्यान एकही ‘लोकल’ ट्रेन धावणार नाही, पण…

 

Related Posts