IMPIMP

Crack Heels Remedies | घरीच बर्‍या करू शकता भेगा पडलेल्या टाचा, ‘या’ आहेत पद्धती

by nagesh
Crack Heels Remedies | how to fix cracked heels home remedies causes

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Crack Heels Remedies | पायात भेगा पडणे किंवा ज्याला क्रॅक हील्स म्हणतात ती एक सामान्य समस्या आहे. बहुतेक लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. क्रॅक हील्सची ही समस्या स्त्रिया, पुरुष आणि लहान मुलांना होऊ शकते, परंतु बहुतेक महिलांना याचा सामना करावा लागतो. या समस्येवरील घरगुती उपाय जाणून घेवूया… (Crack Heels Remedies)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टाचांच्या भेगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय

हील बाम आणि मॉइश्चरायझर वापरा
हील बामच्या मदतीने टाचांना मॉइश्चरायझेशन मिळते आणि त्या मऊ होतात. मृत त्वचा बाहेर येते. काही टाचांच्या बाममुळे थोडी जळजळ जाणवते जी पूर्णपणे सामान्य असते. टाचांमध्ये जास्त क्रॅक असल्यास, हील बाम वापरण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा. (Crack Heels Remedies)

 

पाय भिजवा एक्सफोलिएट करा
जेव्हा टाचा फुटतात तेव्हा त्यांच्या सभोवतालची त्वचा खूप कोरडी आणि जाड होते. जेव्हा तुम्ही या त्वचेवर दाब देता तेव्हा तिला भेग पडते. अशावेळी पाय भिजवून ठेवल्याने आणि मॉइश्चरायझर वापरल्याने खूप फायदा होतो. यासाठी पाय भिजवा –

 

कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडा शॅम्पू मिसळा आणि पाय 20 मिनिटे भिजवा.

यानंतर, कडक त्वचा लूफा, फूट स्क्रबर आणि प्युमिस स्टोनने काढून टाका.

त्यानंतर पाय कोरडे करा.

प्रभावित भागात हील बाम वापरा.

यानंतर पायांवर पेट्रोलियम जेली लावा.

पाय कोरडे असताना स्क्रब करणे टाळा. यामुळे तुमच्या त्वचेचे आणखी नुकसान होईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लिक्विड बँडेज –
भेगा पडलेल्या टाचांची समस्या टाळण्यासाठी लिक्विड बँडेज वापरू शकता, ज्यामुळे संसर्ग टाळता येईल. भेगा खूप तीव्र असतील आणि त्यातून रक्तही येत असेल, तर लिक्विड बँडेज हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तत्पूर्वी पाय पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडे करा.

 

मध –
भेगा पडण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी मध एक नैसर्गिक उपाय म्हणून खूप मदत करू शकते. 2012 च्या अहवालानुसार, मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. संशोधनात असे आढळून आले की मधामुळे भेगा पडण्याच्या समस्येपासून सुटका मिळते आणि ते त्वचेला मॉइश्चरायझेशन देखील करते.

 

खोबरेल तेल –
कोरड्या त्वचेसाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर ठरते. पाय भिजवल्यानंतर खोबरेल तेल वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. नारळाच्या तेलामध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे भेगा पडल्यामुळे होणारे संक्रमण टाळू शकते.

 

क्रॅक हील्सची ही आहेत कारणे
क्रॅक हीलचे पहिले लक्षण म्हणजे त्या भागातील त्वचा कोरडी अरिए जाड होणे. क्रॅक टाचांच्या समस्येची इतर अनेक कारणे आहेत ज्यात समाविष्ट आहे –

 

1. तासनतास उभे राहणे

2. अनवाणी चालणे, आणि मागून उघडी चप्पल घालणे

3. गरम पाण्याने जास्त वेळ आंघोळ

4. कडक साबण वापरणे, यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते.

5. नीट न बसणारे आणि टाचांना आधार न देणारे शूज घालणे.

6. हवामानामुळे त्वचा कोरडी पडते, जसे की हिवाळा आणि कमी आर्द्रता

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

क्रॅक हीलची मेडिकल कारणे
मधुमेहामुळे त्वचा खूप कोरडी होऊ लागते, त्यामुळे हात-पायांची त्वचा खूप कोरडी होते आणि त्यात भेगा पडू लागतात. अशा अनेक परिस्थिती आहेत ज्यामुळे तुम्हाला टाचांना भेगा पडण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो जसे –

 

व्हिटॅमिनची कमतरता
फंगल इन्फेक्शन
हायपोथायरॉईडीझम
एटॉपिक डर्मेटायटीस
सोरायसिस
लठ्ठपणा
प्रेग्नंसी
एजिंग

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Crack Heels Remedies | how to fix cracked heels home remedies causes

 

हे देखील वाचा :

Shivsena On Abdul Sattar | …उगाच काव काव करू नका, शिवसेनेने शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांना दिले जशास-तसे उत्तर

Rohit Pawar | वेदांता-फॉक्सकॉन : आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेचे रोहित पवारांकडून समर्थन, म्हणाले – ते पुरावे…

Diabetes | डायबिटीजचा धोका ‘या’ 6 लोकांना जास्त, तुमचा सुद्धा यामध्ये समावेश नाही ना?

 

Related Posts