IMPIMP

Shivsena On Abdul Sattar | …उगाच काव काव करू नका, शिवसेनेने शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांना दिले जशास-तसे उत्तर

by nagesh
Uddhav Thackeray | shivsena uddhav thackeray targets cm eknath shinde abdul sattar controversy

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Shivsena On Abdul Sattar | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घरात बसून राहिल्याने शिवसेनेची सत्ता गेली. आता तर पुढील दहा जन्म तुमची सत्ता येणार नाही, असे भाकित शिंदे गटाचे (Shinde Group) कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल एका जाहिर भाषणात केले होते. यावर आज शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि नेत्या निलम गोर्‍हे (Nilam Gorhe) यांनी जशास-तसे उत्तर (Shivsena On Abdul Sattar) दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोर्‍हे यांनी म्हटले की, ही सगळी भाकितं म्हणजे कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते असा प्रकार आहे. त्यामुळे त्यांनी उगाच काव काव करु नये.

 

सत्तार यांनी कालच्या एका जाहीर भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, घरात बसून राहिल्याने सत्ता गेली. मुख्यमंत्री हे छोटे पद नाही याचा आता अंदाज लावता येत आहे. हे कशामुळे झाले? घरात बसल्यामुळे. आज तुम्ही शाखेमध्ये चालले, मैदानात बोलवण्याची तयारी, लोकांना आसमान दाखवू म्हणाले.

 

मग अडीच वर्ष काय केले? मुख्यमंत्री म्हणजे छोटे पद नाही. ते किती शक्तीशाली असते याचा अंदाज आज
माझ्यासारखा कार्यकर्ता लावू शकतो. ज्यावेळेस होता त्यावेळेस काही दिले नाही.
आता काय देणार? तुमची सत्ता येण्याचे स्वप्न पुढच्या दहा जन्मांमध्ये पण पूर्ण होणार नाही हे मी सांगतो.
यावरून शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shivsena On Abdul Sattar | eknath shinde govt minister abdul sattar says ex cm uddhav thackeray will not seat in power for next 10 birth shivsena respond

 

हे देखील वाचा :

Rohit Pawar | वेदांता-फॉक्सकॉन : आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेचे रोहित पवारांकडून समर्थन, म्हणाले – ते पुरावे…

Diabetes | डायबिटीजचा धोका ‘या’ 6 लोकांना जास्त, तुमचा सुद्धा यामध्ये समावेश नाही ना?

Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य उद्या ठरणार, सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

 

Related Posts