IMPIMP

Deepali Dhumal | ‘हे तर भाजपने केलेले गलिच्छ राजकारण’, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांची टीका

by nagesh
ali Dhumal | Provide facility to get urban poor scheme card at all places in Pune city; Demand of former Leader of Opposition Deepali Dhumal 

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन आज महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial) भुमिपुजन समारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षांच्या नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमाच्या आमंत्रणावरुन विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी सत्ताधारी भाजपवर (BJP) टीका केली आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहू नये यासाठी ऐनवेळेस सत्ताधारी भाजपने गलिच्छ राजकारण (Dirty politics) केल्याचा आरोप दिपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

दिपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते परंतु पास मात्र आज सकाळी अकरा वाजता घरी मिळाले. हे पास दिल्यानंतर काही वेळाने महापौर कार्यालयातून (Mayor Office) निरोप आला की कार्यक्रमाला येताना कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट (corona RT PCR test) करून येणे आवश्यक आहे व तशा प्रकारचे रिपोर्ट देणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले. खर तर ऐनवेळेस सत्ताधारी भाजप ने केलेले गलिच्छ राजकारण आहे. आधीच या दोन महापुरुषांचे फोटो जाहिराती मध्ये न टाकुन एक प्रकारचा अवमान केले आहे. आणि विरोधकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहूच नये अशा प्रकारची ऐनवेळेस नियोजन केले असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.

कोरोना टेस्ट करून घ्यायची बंधनकारक होते तर यासंबंधीची सुचना दोन-तिन दिवस अगोदर देणे आवश्यक होते.
ही टेस्ट केल्यानंतर साधारण चोवीस तासांनी रिपोर्ट (test report) मिळतो याची जाणीव असताना सुध्दा सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला का सुचना दिल्या नाहीत.
हे जाणीवपूर्वक केले क्रुत्य आहे. या भाजपच्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो.
महापालिकेच्या एका चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला इच्छा असताना हजर राहता आले नाही.
भाजप ने स्वत:च्या पक्षाचा अजेंडा राबवून कार्यक्रम केला, असेही दिपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Deepali Dhumal | ‘This is dirty politics done by BJP’, criticizes Opposition Leader Deepali Dhumal NCP Corporator

Related Posts