IMPIMP

Delhi Crime | ‘डेक्सटर’ वेब सिरीज पाहून प्रियसीचे केले 35 तुकडे; वसईच्या श्रद्धा वालकरचे खून प्रकरण

by nagesh
Delhi Crime | shraddha walkar murder case dexter web series inpsired aaftab poonawala to kill her girl friend

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर (वय 27) (Shraddha Walkar Murder Case) या तरुणीचा दिल्लीत निर्घुण खून (Delhi Crime) करण्यात आला. तिचा प्रियकर आफताब पुनावाला (वय 28) (Aaftab Poonawala) याने तिचा गळा दाबून खून करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे (Delhi Crime) केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने देशात खळबळ उडाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आफताबने 18 मे रोजी श्रद्धाचा खून केला. यानंतर त्यांने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन फ्रिजरमध्ये ठेवले. ते तुकडे एक एक करुन त्याने महारौलीच्या जंगलात नेऊन पुरले, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल पाच महिन्यांनी ही घटना उघडकीस आली आहे. आफताब आणि श्रद्धा यांच्यात वसईत प्रेमसंबंध जुळले. आंतरजातीय विवाहास श्रद्धाच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे दोघेही दिल्लीला गेले आणि एका कॉल सेंटरमध्ये नोकरीला होते. त्यानंतर लग्न करण्यासाठी श्रद्धाने आफताबकडे तगादा लावला. त्यांच्यात वाद होऊन आफताबने श्रद्धाचा खून केला. 12 ऑक्टोबर रोजी आफताब बेपत्ता असल्याची तक्रार वसई पोलिसांत (Vasai Police Station) दाखल झाली. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. दिल्ली पोलिसांना (Delhi Police) आफताबला अटक करुन बोलते केल्यावर त्याने अनेक खुलासे केले. यावेळी आफताबने ‘डेक्सटर’ (Dexter) ही वेब सीरिज पाहून खुनाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती दिली. अमेरिकन वेब सीरिजमुळे दिल्लीतील हत्याकांडांचा कट रचला गेला.

 

ही ‘डेक्सटर’ वेबसारीज काय आहे, याची आता सर्वांना उत्सुक्ता आहे. डेक्सटर’ ही एक अमेरिकन क्राइम वेब सीरिज आहे. यातील नायक आपल्या लहानपणी आईची निर्घुण हत्या डोळ्यांनी पाहतो. त्याची ही कथा आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी अनाथ झालेल्या या डेक्सटरला हॅरी मॉर्गन नावाचा पोलीस अधिकारी दत्तक घेतो. डेक्सटरच्या मनावर आईच्या हत्येचा खूप घातक परिणाम झालेला असतो. त्यातून तो खुनशी आणि रासवट झालेला असतो. त्याच्यात दया आणि ममता यांचा अभाव असतो. तो जगाकडे एका वेगळ्याच नजरेतून पाहत असतो.
दुसरीकडे डेक्सटर हा खूप हुशार आणि चालाख दाखविला गेला आहे.

 

हॅरी कायद्याच्या कचाट्यातून सुटलेल्या आरोपींची डेक्सटर कडून हत्या करून घेतो.
त्यानंतर आपल्यावर कुणालाही संशय येणार नाही, या हेतूने डेक्स्टर एका पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक
स्पेशालिस्टची नोकरी करू लागतो. डेक्सटर आरोपींची हत्या करताना कोणताही पुरावा सापडणार नाही,
याची काळजी घेतो. ज्या ठिकाणी आरोपींची हत्या करणार आहे, त्या संपूर्ण खोलीमध्ये प्लास्टिक अंथरुन
अत्यंत हुशारीने डेक्सटर त्यांचा खून करतो. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून अ‍ॅटलांटिक महासागरात
(Atlantic Ocean) फेकून त्यांची विल्हेवाट लावतो. अशा प्रकारची चित्तथरारक ही वेब सीरीज आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Delhi Crime | shraddha walkar murder case dexter web series inpsired aaftab poonawala to kill her girl friend

 

हे देखील वाचा :

Bhumi Pednekar | “वाह, काय ती सुंदरता..”, भूमी पेडणेकरचे लेटेस्ट फोटो पाहुन होताल घायाळ, पहा फोटो एका क्लिकवर

Rahul Narvekar | जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Lokmanya Hospitals | ‘लोकमान्य’मध्ये देशातील पहिली ‘ग्रेड फोर रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सिस्टीम’ दाखल; गुडघा प्रत्यारोपण होणार आणखी सुकर

 

Related Posts