IMPIMP

Rahul Narvekar | जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

by nagesh
Rahul Narvekar | Assembly Speaker Rahul Narvekar's reaction to Jitendra Awada's resignation; said...

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे ते त्यांचा राजीनामा स्वीकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधीमंडळाच्या कोणत्याही सदस्याचा माझ्याकडे राजीनामा आलेला नाही. तो आल्यानंतर सर्व नियम तपासून कार्यवाही केली जाईल, असे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आतापर्यंत माझ्याजवळ जितेंद्र आव्हाड किंवा अन्य कोणत्याही सदस्याचा राजीनामा आलेला नाही. एखाद्या आमदाराला राजीनामा द्यायचा असेल, तर तो विधीमंडळ अध्यक्षांना दिला जातो. आव्हाड मागील 20 वर्षे विधीमंडळात काम करत आहेत. त्यामुळे या गोष्टी त्यांना माहीत आहेत. राजीनामा स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करावी लागते. राजीनामा देण्याची कार्यपद्धती आणि नियम असतात. या सर्वांचे पालन झाले आहे की नाही, हे पाहावे लागते. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर राजीनामा स्वीकारायचा की नाही, हे ठरवले जाते, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

 

एखाद्या प्रकरणाची चौकशी सुरु असेल, तर यंत्रणांना त्यांचे काम करण्याची संधी द्यावी. एखादी व्यक्ती निर्दोष असेल, तर तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. विधीमंडळाच्या सदस्यांवर कोणतीही फौजदारी कारवाई करायची असेल किंवा त्याला अटक करायची असेल, तर ती माहिती विधीमंडळ अध्यक्षांना दिली जाते. विधीमंडळ सदस्यांचे अधिकार आबाधीत ठेवण्याची जबाबदारी विधीमंडळाची आणि अध्यक्षांची आहे. ती आम्ही पार पाडत आहोत, असेही यावेळी नार्वेकर म्हणाले.

 

आपल्यावर गेल्या तीन दिवसांत 2 खोट्या केसेस या हुकुमशाही सरकारने दाखल केल्या आहेत.
त्यामुळे लोकशाहीची हत्या होत आहे. ती मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही.
त्यामुळे मी राजकारणातून दूर जाण्याची निश्चय केला आहे. मी राजीनामा देत आहे,
असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. त्यांना राजीनामा न देण्याची विनंती त्यांच्या पक्षाच्या
खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील
(Jayant Patil) यांनी केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rahul Narvekar | Assembly Speaker Rahul Narvekar’s reaction to Jitendra Awada’s resignation; said…

 

हे देखील वाचा :

Dhananjay Munde | ‘भाऊ असे पर्यंत बहिणीचा चेक बाऊन्स होणार नाही…’; धनंजय मुंडेंचे पंकजाताईंना आश्वासन

Pune Crime | मसाज करुन घेणे पडले महागात, नजर चुकवून मंगळसुत्र केले लंपास; लोणीकंद पोलीस ठाण्यात FIR

Lokmanya Hospitals | ‘लोकमान्य’मध्ये देशातील पहिली ‘ग्रेड फोर रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सिस्टीम’ दाखल; गुडघा प्रत्यारोपण होणार आणखी सुकर

 

Related Posts