IMPIMP

Devendra Fadnavis | फडणवीसांचा संजय राऊतांना ‘टोला’; म्हणाले – ‘अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू’

by nagesh
Sanjay Raut | devendra fadnavis is handling maharashtra govt says sanjay raut in press conference

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले. अमरावती, मालेगाव, नांदेड या शहरात गेली काही दिवस राडा सुरू आहे. अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण (Amravati Violence) लागल्यानंतर दुकानांची तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक मराठी गाणं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

त्यावेळी बोलताना देेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ‘अमरावतीमध्ये दंगल उसळली. अचानक हजारो लोक एकत्र येऊन मोर्चे कसे काढतात? याबाबत सरकारला काहीही माहिती नाही असं कसं होऊ शकतं. या मोर्च्यामध्ये निवडून निवडून हिंदूंची दुकानं फोडली जातात. पण, हिंदूंची दुकानं जाळली गेली तेव्हा महाविकास आघाडीचा एकतरी नेता बोलला का?, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ‘कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू,’ असं देेवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना म्हणाले आहेत. तर, संजय राऊत म्हणतात, भाजपने दंगल घडवून आणली. ते असं कसं बोलू शकतात, असं फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. तसेच फडणवीसांनी मलिकांवरही टीका केली आहे. नवाब मलिकांचा काही प्रश्नच नाही. हर्बल तंबाखूमुळे ते काहीही बोलतात. त्यांना त्यासाठीच ठेवलं आहे. या दंगलीचा आरोप सरकारवर येऊ नये म्हणून कव्हर फायरींगसाठी मलिकांनी तसं वक्तव्य केलं, असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis criticized sanjay raut on hiduism in amravati violence case

 

हे देखील वाचा :

Earn Money | 786 सीरीजची एखादी नोट तुमच्याकडे आहे का? तर मिनिटात मिळतील 3 लाख रुपये; जाणून घ्या कशी होईल कमाई

MP Amol Kolhe | ‘ज्यात आपलं काडीचंही योगदान नाही, त्याबद्दल बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नये’ – अमोल कोल्हे

Dr Amol Kolhe | ‘हॉस्पीटलमधील तुमच्या पेशंटसाठी म्हणाल का, याला भगव्याचच रक्त द्या’; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंवर निशाणा

 

Related Posts