IMPIMP

Digital Currency | कसा करणार ‘डिजिटल रुपया’ने व्यवहार, मोबाईलच असेल आता बँक!

by nagesh
Digital Currency | explainer how digital rupee will work and how transaction will be done

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Digital Currency | अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 2022 चा अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की रिझर्व्ह बँक (RBI) पुढील आर्थिक वर्षात डिजिटल रुपया लाँच करेल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, डिजिटल रुपया हे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (Central Bank Digital Currency) असेल, जे 2022-23 मध्ये लॉन्च केले जाईल. (nirmala sitharaman)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

अर्थव्यवस्थेला चालना देईल
त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात डिजिटल रुपयाचे फायदेही सांगितले. अर्थमंत्र्यांनी सांगितले की सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) डिजिटल अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण चालना देईल. सीतारामन म्हणाल्या, डिजिटल करन्सीमुळे करन्सी मॅनेजमेंट सिस्टम आणखी किफायतशीर होईल. CBDC म्हणजे काय आणि त्याचे फायदे जाणून घेऊयात…

 

काय आहे CBDC
सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) हे RBI द्वारे जारी करण्यात येणारे डिजिटल चलन आहे. हे एक लीगल टेंडर असेल. आरबीआयच्या मते, हे सेंट्रल बँकेने जारी केलेले चलन असेल परंतु ते कागद किंवा पॉलिमरपेक्षा वेगळे असेल.

 

ही एक सॉवरेन करन्सी असेल आणि केंद्रीय बँकेच्या ताळेबंदात ते एक दायित्व म्हणून दाखवले जाईल. सीबीडीसीला समान मूल्यात कॅशमध्ये एक्सचेंज करता येईल. (nirmala sitharaman)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सीबीडीसीची का आहे आवश्यकता
डिजिटल करन्सी जाळता येऊ शकत नाही किंवा तिचे नुकसान करता येत नाही. म्हणून एकदा जारी केल्यावर ते नेहमी तिथे असेल परंतु नोटांच्या बाबतीत असे नाही. किफायतशीर असल्याने, जगभरात सीबीडीसीबाबत खूप उत्सुकता दिसून आली आहे.

 

मात्र, आतापर्यंत केवळ काही देशांनाच या बाबतीत पायलट प्रोजेक्ट पुढे नेण्यात यश आले आहे. सीबीडीसी हे कोणत्याही देशाचे अधिकृत चलनाचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा डिजिटल टोकन असते.

 

कसे होईल ट्रांजक्शन
डिजिटल रुपया प्रत्यक्षात ब्लॉकचेनसह इतर तंत्रज्ञानावर आधारित अन्य चलन असेल.
डिजिटल चलनाचे दोन प्रकार आहेत – किरकोळ आणि घाऊक. घाऊक चलन वित्तीय संस्थांद्वारे वापरले जाते,
तर रिटेल डिजिटल चलन सामान्य लोक आणि कंपन्या वापरतात.

 

प्रत्यक्षात ब्लॉकचेन तंत्रज्ञान विकेंद्रित असते. याचा अर्थ सर्व प्रकारची माहिती एका नेटवर्कच्या सर्व संगणकांवर असते.
मात्र, डिजिटल रुपया यापेक्षा वेगळा असेल. याचे कारण आरबीआयद्वारे त्याचे नियमन केले जाईल. ते प्रत्यक्षात विकेंद्रित नसेल.
तुम्ही मोबाईलवरून ते एकमेकांना सहज पाठवू शकाल आणि सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करता येतील आणि सेवा वापरता येतील.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Digital Currency | explainer how digital rupee will work and how transaction will be done

 

हे देखील वाचा :

Pune NCP | PMPML कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून महापालिकेला ‘मानवी साखळी’द्वारे घेराव

Pune Station-Hadapsar Railway Terminal | पुणे स्थानकासाठी 31 कोटी निधी मंजूर; हडपसर टर्मिनलसाठी 21 कोटी

Digital Currency vs Cryptocurrency | क्रिप्टो करन्सी आणि डिजिटल करन्सीमध्ये फरक काय?, जाणून घ्या

 

Related Posts