IMPIMP

Pune NCP | PMPML कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून महापालिकेला ‘मानवी साखळी’द्वारे घेराव

by nagesh
Pune NCP | NCP's complaint to Anti Corruption Bureau (ACB) Pune against corruption in various projects in Pune Municipal Corporation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune NCP | पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता आल्यापासून PMPML कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय करण्याचे धोरण सत्ताधाऱ्यांनी अवलंबले आहे. वर्षानुवर्षे पुणेकरांची सेवा करणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांची पदोन्नती सत्ताधारी भाजपने केली नाही. सभागृहात चर्चा करूनही PMPML कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू केला नाही. PMPML कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेला मानवी साखळी द्वारे (Human Chain) घेराव करून आंदोलन (Agitation) करण्यात आले. त्यावेळी प्रशांत जगताप बोलत होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रशांत जगताप पुढे म्हणाले, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रुजू करणे याकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. संपूर्ण शहर कोरोनाच्या (Corona) संकटाशी लढा देत असताना PMPML कामगारांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली मात्र या कोरोना काळातील सेवेचे वेतनही महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिले नाही. यावर कळस म्हणजे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या देश विकण्याच्या योजनेतून प्रेरणा घेत सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकाही विकायला काढली, असा घणाघाती आरोप जगताप यांनी केला.

 

PMPML च्या खासगीकरणाची (Privatization) चाचपणी सुरू केली. पुणे शहराच्या (Pune City) विकासात PMPML कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे, असे असतानाही कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. कोरोनाच्या काळात बसेस बंद असतानाही ठेकेदारांना (Contractor) तब्बल 160 कोटी रुपये देणारे सत्ताधारी भाजप कर्मचाऱ्यांच्या वेतानाच्यावेळी मात्र हात आखडता घेतात. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) वतीने आंदोलन करण्यात आले असल्याचे जगताप यांनी सांगितले.

 

 

या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी द्वारे संपूर्ण महापालिकेस घेराव घातला होता. एक खासदार, सहा आमदार, महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, PMPML वरील संचालक भाजपचे असतानाही कर्मचाऱ्यांवर अन्याय होतोय याचा अर्थ भाजपला कर्मचाऱ्यांच्या हिताची पर्वा नाही, त्यांना फक्त ठेकेदाराचे कल्याण करायचे आहे. असे यावेळी प्रशांत जगताप यांनी सांगितले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहराध्यक्ष व सभागृहातील सदस्य या नात्याने प्रशांत जगताप यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला की,
येत्या 7 दिवसांत PMPML कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू न झाल्यास पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर,
कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या या अक्रोशाने भाजप नेत्यांचे रस्त्यावर फिरणेही अशक्य होईल.
यासोबतच पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आल्यास पहिल्याच बैठकीत
PMPML कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे अश्वासन त्यांनी कामगारांना दिले.

 

यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिपाली धुमाळ (Deepali Dhumal), कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे,
प्रदीप देशमुख (NCP Pradeep Deshmukh), सोमनाथ शिंदे, किरण थेऊरकर, सुनील नलावडे, राजेंद्र कोंडे, हरीश ओहोळ,
कैलास पासलकर आदींसह PMPML युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune NCP | NCP besieges PMC through ‘human chain’ for various demands of PMPML employees

 

हे देखील वाचा :

Pune Station-Hadapsar Railway Terminal | पुणे स्थानकासाठी 31 कोटी निधी मंजूर; हडपसर टर्मिनलसाठी 21 कोटी

Digital Currency vs Cryptocurrency | क्रिप्टो करन्सी आणि डिजिटल करन्सीमध्ये फरक काय?, जाणून घ्या

Pune Crime | Thergaon Queen सोबत अश्लील व्हिडिओ बनवणारा ‘कुणाल’ गजाआड; पोलिसांनी खाक्या दाखवताच मागितली माफी अन्…

 

Related Posts