IMPIMP

Dr. Bharat Patankar | आदिवासी तरूण, आदिवासी समाजाची फसवणूक करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा – डॉ. भारत पाटणकर (Video)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारवाई करणेबाबत निवेदन देणार

by nagesh
Dr. Bharat Patankar | Take immediate action against those who are cheating tribal youth, tribal community – Dr. Bharat Patankar (Video)

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Dr. Bharat Patankar | पालघर जिल्हयातील (Palghar) रामपूर खेडपाडा व सध्या पुणे (Pune) येथे वास्तव्यास असणारा अमृत पडवळे या तरूणाच्या नावे एक कोटीचे बनावट कर्ज काढून आदिवासी तरूणाला फसवण्याचा तसेच आदिवासी समाजाची (Tribal Samaj) जमीन बेकायदेशीरपणे खरेदी करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई आठ दिवसात करावी अन्यथा राज्यभर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते काँ. भारत पाटणकर यांनी दिला आहे. (Dr. Bharat Patankar)

अमृत केशव पडवळे (Amrut Keshav Padwale) हा आदिवासी तरूण ऑर्चिड स्कुल बाणेर (Orchid School Baner) येथे नोकरीस होता. संबंधितांनी अमृत पडवळे यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांची व आदिवासी समाजाची फसवणुक केली आहे. नोकरीला लावतो, महिना २५ हजार देतो असे अमिष दाखवून (Lure Of Job) अमृत पडवळे यांच्या नावावर ठाणे जिल्ह्यातील (Thane) व परिसरातील आदिवासी समाजाची जमीन खरेदीखत करून घेतली. तसेच त्यानंतर त्याच्या परस्पर अमृतच्या नावे जनकल्याण मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी सोलापूर (Jankalyan Multistate Co-Operative Credit Society Ltd. Solapur) येथील बँकेतून बनावट कागदपत्रे व सहया वापरून रू. १,१०,००,०००/- (रूपये एक कोटी दहा लाख) चे कर्ज काढले व ते परस्पर अमर जाधव व यशवंत पाटील यांनी स्वत:कडे घेतले. अशा प्रकारे एका मागासवर्गीय आदिवासी तरूणाला जाळ्यात अडकवून त्याच्यामार्गे अनेक गैरप्रकार करण्याचा प्रयत्न सदर लोकांनी केला आहे. आदिवासी समाजाची जमीन खरेदी करता येत नसल्याने या तरूणाला अमिष दाखवुन फसवणूक (Cheating Case) करण्यात आली आहे. (Dr. Bharat Patankar)

 

 

सदर प्रकार लक्षात येताच अमृत पडवळे यांनी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
परंतु गुन्हा दाखल होवुनही इतक्या दिवसात आरोपींना अटकही केली नाही त्यामुळे संबंधितांवर तातडीने
कारवाई करण्याची मागणी श्रमिक मुक्ती दलाच्या (Shramik Mukti Dal) वतीने करण्यात येत आहे.
सदर झालेल्या आदिवासी तरूणाच्या फसवणुकीचे व अन्यायाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना देण्यात येणार आहे.

डॉ. भारत पाटणकर राष्ट्रीय अध्यक्ष श्रमिक मुक्ती दल

Web Title : Dr. Bharat Patankar | Take immediate action against those who are cheating tribal
youth, tribal community – Dr. Bharat Patankar (Video)

Related Posts