IMPIMP

Dr. J. J. Pandit Highschool Lohara | डॉ. जे. जे. पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथील १९९७ च्या बॅचचा स्नेह मेळावा दिमाखात संपन्न

by nagesh
Dr. J. J. Pandit High School Lohara | Dr. J. J. Pandit Secondary School Lohara 1997 batch of friendship meeting News

लोहारा : सरकारसत्ता ऑनलाईन- Dr. J. J. Pandit Highschool Lohara | डॉ. जे. जे पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा, ता. पाचोरा (जळगाव) या शाळेतील १९९७ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी २३ एप्रिल २०२३ रोजी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. हा सोहळा दिमाखात संपन्न झाला. (Dr. J. J. Pandit Highschool Lohara)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे माजी मुख्याध्यापक अब्दुल पटेल, शाळेचे आजी मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी, श्रीमती उज्ज्वला शेळके, माजी उपशिक्षक रोनखेडे , दिलीप सूर्यवंशी, एस टी चौधरी, बावस्कर सर, लिंगायत सर, ग्रामपंचायत सदस्या अनिता चौधरी , डेटा कलेक्शन ऑफिसर मनीषा लुंकड, नायब तहसिलदार कौतिकराव रावलकर आणि गणेश उबरहांडे उपस्थित होते. (Dr. J. J. Pandit Highschool Lohara)

 

या कार्यक्रमाचा उद्देश २६ वर्षानंतर सर्वांनी एकत्र येऊन , जे माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत त्यांनी शाळा आणि गाव याच्या विकासासाठी प्रयत्न करणे आणि त्याच बरोबर जुन्या आठवणींना उजाळा देणे.

 

यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि सन्मान माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आला. १९९७ च्या माजी विद्यार्थिनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या पुण्यातील रिता इंडिया फाउंडेशनच्या (Ritaa India Foundation) संस्थापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया (Dr. Rita Madanlal Shetiya Awarded) यांचा विशेष सत्कार आणि सन्मान शाळेतर्फे आणि १९९७ च्या बॅच तर्फे मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी, माया पाटील आणि सविता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी ११,०००/- रुपये रोख रक्कम शाळेच्या विकासासाठी मुख्याध्यापक परदेशी सर यांच्या कडे १९९७ च्या बॅचकडून सुपूर्त करण्यात आली.

 

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वनाथ बोरसे, उदय जगताप, नवल सरोदे, एकनाथ भोसांडे , ज्ञानेश्वर माळी, विजय चौधरी, विनोद भगत , कैलास चौधरी, दिनकर चौधरी आणि कीर्ती सांकला यांनी प्रयत्न केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कार्यक्रमाचे सूत्रंसचालन उमेश देशमुख आणि डॉ. रिता शेटीया यांनी केले.

 

यावेळी अध्यक्षीय भाषणात पटेल सर म्हणाले , अश्या प्रकारे स्नेह मेळावे प्रत्येक बॅच ने घेतले पाहिजे. यामुळे आपले विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात कार्य करत आहेत हे शाळेला आणि गावालाही समजते.

 

मुख्याध्यापक परदेशी सर म्हणाले , तुमच्या या बॅच मधील प्रत्येक विद्यार्थी करत असलेले कार्य उलेक्खनिय आहे. तुमची प्रेरणा घेऊन इतर बॅचेस अश्या प्रकारे स्नेह मेळावा आयोजित करतील.

 

 

Web Title :  Dr. J. J. Pandit High School Lohara | Dr. J. J. Pandit Secondary School Lohara 1997 batch of friendship meeting News

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वारजे पोलिस स्टेशन – आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून 86 लाखांची फसवणूक करणारा अटकेत

Pune Crime Accident News | पुणे क्राईम न्यूज : बकोरी-केसनंद रोडवर 2 कारची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी

 

Related Posts