IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वारजे पोलिस स्टेशन – आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून 86 लाखांची फसवणूक करणारा अटकेत

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Warje Police Station - 86 Lakh fraudster arrested by offering attractive returns

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | रियल वॉल्यु इंटरप्राईज (Real Value Enterprise) नावाने व्यवसाय असून चांगला व आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ३२ जणांची ८६ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) करणार्‍यास पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Crime News)

 

निलेश गिरीश जोशी Nilesh Girish Joshi (वय ४५, रा. कोथरुड – Kothrud) असे त्याचे नाव आहे. त्याची पत्नी आश्विनी निलेश जोशी Ashwini Nilesh Joshi (वय ४१, रा. कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रोहीत गुलाब खिलारे (वय ३१, रा. कर्वेनगर – Karvenagar) यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये (Warje Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६८/२३) दिली आहे. हा प्रकार मे २०२२ पासून सुरु होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश जोशी याने आपली रियल वॉल्यु इंटरप्राईज (Real Value Enterprises ) या नावाने व्यवसाय असून ती एन एस बी, बी एस एफ मध्ये उत्तम प्रकारे उलाढाल करते. असे सांगून फिर्यादी व त्यांचे मित्र, नातेवाईक यांचा विश्वास संपादन केला. त्यांना वार्षिक गुंतवणुकीबाबत चांगला व आकर्षक परतावा मिळवून देण्याची योजना सांगितली. फिर्यादी व त्यांचे मित्र, नातेवाईक अशा ३२ जणांकडून ८६ लाख ७५ हजार रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर परतावा व गुंतवणुक केलेली रक्कम परत न देता फसवणूक (Fraud Case) केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन निलेश जोशी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करीत आहेत.

 

 

Web Title :   Pune Crime News | Pune Crime News : Warje Police Station – 86 Lakh fraudster arrested by offering attractive returns

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मुंढवा पोलिस स्टेशन – भांडणे सोडविण्यास गेलेल्या कंपनी मालकाच्या डोक्यात दगड घालून केला खून

Pune Crime Accident News | पुणे क्राईम न्यूज : बकोरी-केसनंद रोडवर 2 कारची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी

 

Related Posts