IMPIMP

ICL Graduates – Teachers Constituencies Election | लोकसभेच्या रणधुमाळीत विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा, पदवीधरसाठी 10 जूनला मतदान

by sachinsitapure

मुंबई : – ICL Graduates – Teachers Constituencies Election | राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरू असताना आता आणखी एका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत. राज्यात चार जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. या चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे मुंबई, नाशिक व कोकण विभागात 10 जूनला मतदान होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार 10 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या वेळापत्रकानुसार 15 मे 2024 रोजी नोटीफिकेशन जारी केले जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 22 मे असेल. तर अर्ज मागे घेण्याची मुदत 27 मे असणार आहे.

या चारही जगांसाठी मतदान 10 जून रोजी होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत असणार आहे. मतमोजणी 13 जून रोजी होईल. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया 18 जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

Related Posts