IMPIMP

Dr. Suvarna Vaje Murder Case | डॉ सुवर्णा वाजे यांचे मोबाईल चॅट डिलीट; पतीने असं का केलं? धक्कादायक खुलासा समोर

by nagesh
Dr. Suvarna Vaje Murder Case | dr suvarna vaje murder case shocking information revealed her mobile chat delete husband sent to police custody nashik news

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन – Dr. Suvarna Vaje Murder Case | नाशिकच्या महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) वैद्यकीय अधिकारी डॉ. वाजे यांचा मृतदेह गाडीमध्ये जळालेल्या अवस्थेत (Dr. Suvarna Vaje Murder Case) आढळला होता. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी डॉ. सुवर्णा यांचे पती संदीप वाजेला (Sandeep Vaje) पोलिसांनी ताब्यात (Arrested) घेतले. यानंतर संदीप वाजे याला 16 फेब्रुवारीपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला. त्यांच्या याच गाडीत एक चाकूही आढळून आला. तर, डॉ. सुवर्णा वाजे यांनी केलेले चॅट मोबाइलमधून डिलीट केल्याचं तपासामध्ये उघड झालंय. यानंतर त्यांचा पती संदीप याला संशयित म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. त्यानेच सुवर्णा वाजे यांच्या मोबाइलमधील चॅट (Mobile Chat) डिलीट केले असल्याचं सांगितलं जातंय. या चॅटमध्ये नेमकं काय होतं जे डिलीट केलं याबाबत सवाल उपस्थित होतो आहे. आता संदीप वाजे याचा मोबाइल फोन आणि डॉ सुवर्णा वाजे यांचाही मोबाइल फोन पोलिसांनी (Police) फॉरेन्सिक विभागाकडे (Forensic Division) पाठवला आहे. या फोनमधील डिलीट केलेला डेटा पोलीस तपासत आहे. (Dr. Suvarna Vaje Murder Case)

डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप वाजे हा दुसरं लग्न करू इच्छित होता. आपल्या दुसऱ्या लग्नात पत्नी अडथळा येत होती आणि त्यामुळेच डॉ. सुवर्णा वाजे यांचा काटा काढला का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. (Dr. Suvarna Vaje Murder Case)

दरम्यान, डॉ सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या.
कोरोनाच्या काळात त्यांनी खूपच चांगले काम केले होते. त्यांच्या कामामुळे त्यांचं कौतुकही झालं होतं.
25 जानेवारी रोजी सुद्धा त्या कामावर होत्या. काम आटोपल्यानंतर त्या रुग्णालयातून निघाल्या होत्या.
25 जानेवारी रोजी शहरालगत असलेल्या रायगड (Raigad) नगर परिसरात एका जळालेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

Web Title :- Dr. Suvarna Vaje Murder Case | dr suvarna vaje murder case shocking information revealed her mobile chat delete husband sent to police custody nashik news

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

How To Protect Smartphone | जर चोरीला गेला स्मार्टफोन तर ताबडतोब असा करा ब्लॉक, अन्यथा मिनिटात बँक अकाऊंट होऊ शकते रिकामे

Become Young Again | चाळीशीत सुद्धा पुरुषांनी कसे राहावे तरूण? 25 व्या वयासारखे आरोग्य मिळवण्यासाठी अवलंबा ‘या’ टिप्स

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या लेटेस्ट दर

Related Posts