IMPIMP

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या लेटेस्ट दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 4 may 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) चढउतार होताना दिसत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आजही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज (शनिवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 46,800 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 63,000 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं दिसून येत होतं. मात्र सध्या सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गतवर्षी 22 कॅरेट सोन्याचा दर पन्नास हजाराच्या आत होता. सध्याही 22 कॅरेट सोन्याचा दर पन्नास हजाराच्या आत आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांसाठी योग्य संधी आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा दर –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,750 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,000 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,750 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,000 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,050 रुपये

आजचा चांदीचा भाव – 63,000 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 12 february 2022

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

ST Workers Strike | ST कामगार संपाचा तिढा सुटणार ? ‘तो’ अहवाल उच्च न्यायालयात सादर

Black Raisins | रिकाम्या पोटी भिजवलेले मनुका खाल्ल्याने होतात आश्चर्यकारक फायदे, वजन कमी करण्यात होते मदत; जाणून घ्या

Rahul Bajaj Passes Away | बजाज समूहाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे 83 व्या वर्षी निधन

Related Posts